शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

आठ जोडप्यांनी नोंदणी कार्यालयात बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 01:50 IST

१४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे अर्थात प्रेमाचा दिवस. त्याची चाहूल लागते ती तरुणाईच्या गिफ्ट व इतर वस्तूंच्या खरेदीतून.

मनीष तसरे -अमरावती : ‘व्हॅलेंटाईन डे' काही जोडप्यांसाठी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ ठरला. तब्बल आठ युगुलांनी जन्मजन्मांतरी सोबत राहण्याची शपथच नव्हे, तर त्यावर अंमलदेखील केला. विवाह नोंदणी कार्यालय गाठून धूमधडाक्यात प्रेमाचा बार उडवला. त्यांच्यासाठी पुढील आयुष्यात या दिवसाच्या प्रेममयी आठवणी कायम स्मरत राहतील, हे नक्की.

१४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे अर्थात प्रेमाचा दिवस. त्याची चाहूल लागते ती तरुणाईच्या गिफ्ट व इतर वस्तूंच्या खरेदीतून. अलीकडे या दिवसाचा जोम ओसरला आणि पर्यायाने त्याला कडाडून होणारा विरोधाचा सूरदेखील मावळला. तथापि, या दिवसाची आठवण ठेवत काही जणांचे नियोजन असते. अशा आठ जोडप्यांचे नियोजन विवाह नोंदणी कार्यालयाच्या मध्यस्थीने तडीस गेले आणि ते एकमेकांच्या प्रेमपाशात बांधले गेले आहेत.

‘तो’ पाच जिल्हे ओलांडून आलालग्नबंधनात अडकण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून निरंजन मेश्राम पाच जिल्हे ओलांडून अमरावतीला नातेवाइकांसह आला. रसिका कुंभलवार हिच्याशी विवाह बंधनात अडकण्यासाठी नोंदणी कार्यालय गाठले. आजचा प्रेमदिन आहे. आमचा प्रेम विवाह नसला तरी व्हॅलेंटाईन डे असल्याने हा दिवस कायम स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया निरंजनने ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :marriageलग्नAmravatiअमरावती