शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

चिखलदऱ्याच्या विकासाला 'इको सेन्सेटिव्ह झोन'चे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 12:55 IST

Chikhaldara development Amravati News चिखलदऱ्याच्या विकासाला इको सेन्सेटिव्ह झोनचे ग्रहण लागले आहे. यातच वन व वन्यजीव विभागाच्या वनाधिकाऱ्यांकडून सिडकोविरुद्ध दोन स्वंतत्र गुन्हे दाखल झाल्यामुळे विकासकामांतील अडचणी वाढल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिखलदऱ्याच्या विकासाला इको सेन्सेटिव्ह झोनचे ग्रहण लागले आहे. यातच वन व वन्यजीव विभागाच्या वनाधिकाऱ्यांकडून सिडकोविरुद्ध दोन स्वंतत्र गुन्हे दाखल झाल्यामुळे विकासकामांतील अडचणी वाढल्या आहेत. चिखलदरा विकास आराखड्यातील मौजा शहापूर ते मौजा मोथा (मखंजी रोड) या मार्गाचे काम थांबविण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या सन २०१६ च्या राजपत्रान्वये चिखलदरा शहरासह संपूर्ण चिखलदरा तालुका इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत वाणिज्यिक खनन, स्टोन क्रशर, रस्ते, पक्के बांधकाम तसेच लेआऊट, एनए प्लॉट बांधकाम व पर्यावरणास धोका निर्माण होईल, अशा कामांना इको सेन्सेटिव्ही झोनमधील संवेदनशील वनक्षेत्रात आणि वनक्षेत्रालगत मनाई करण्यात आली आहे. या क्षेत्रात घनकचरा टाकण्यास बंदी आहे. या क्षेत्रात कुठलेही काम करण्यापूर्वी वन व वन्यजीव विभागासह राज्य शासनाची, राष्ट्रीय वन्यजीव संस्थेची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे.

चिखलदरा शहरासह लगतच्या परिसराच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर आहे. सिडकोने त्याकरिता चिखलदरा विकास आराखडा बनविला आहे. त्यातील काही कामे सिडकोने सुरू केली आहेत. काही सुरू होणार आहेत.दरम्यान, इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये, क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा विकास आराखडा बनविताना, डीपी तयार करताना व अंमलबजावणी करताना इको सेन्सेटिव्ह व्यवस्थापन योजनेसोबत त्यास समाकलित (एकरूप) करणे आवश्यक असल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मखंजी रोडचिखलदरा विकास आराखड्यातील मौजा शहापूर ते मौजा मोथा (मखंजी) रस्ता हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडाच्या बफर क्षेत्रातील वनखंड क्रमांक ४६, ४७ च्या हद्दीवरून जात आहे. यात ३.५७ हेक्टर वनक्षेत्र बाधित होत आहे. हाच रस्ता मेळघाट प्रादेशिक वनविभाग, परतवाडा अंतर्गत वनखंड क्रमांक २१, २२ मधूनही जात आहे आणि हे क्षेत्र इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्यामुळे मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा आणि मेळघाट प्रादेशिक वनविभाग परतवाडा अंतर्गत सिडकोविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे वनाधिकाऱ्यांनी दाखल केले आहेत. या अनुषंगाने मेळघाट वन्यजीव विभागाच्या विभागीय वनाधिकारी पीयूषा जगताप यांनी २३ आॅक्टोबर रोजी पत्राद्वारे सिडकोचे प्रशासक तथा कार्यकारी अभियंता यांना अवगत केले आहे.

हॉटेल असोसिएशनला वनाधिकाऱ्यांकडून पत्ररात्रपत्रान्वये इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये घनकचरा टाकण्यास बंदी आहे. चिखलदरा, शहापूर, आलाडोह येथील हॉटेल व्यवस्थापनाकडून घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाहीत. तो कचरा वनक्षेत्रात टाकलेला आढळून आल्यास हॉटेल व्यवस्थापनावर पर्यावरण वन व जलवायू संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे वन्यजीव विभागाच्या वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कंझर्व्हेशन शुल्कमाफीसाठी वरिष्ठांकडे मागणीमेळघाट व्याघ्र प्रकल्पाभोवतालच्या क्षेत्रातील पर्यटन उद्योगासह निवास व्यवस्थेकडून २०१२ च्या शासननिर्णयानुसार कंझर्व्हेशन फी वसूल करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. तशा नोटीस चिखलदऱ्यातील हॉटेल, रिसोर्ट यांना वन्यजीव विभागाने पाठविल्या आहेत. ९४ महिन्यांच्या कंझर्व्हेशन शुल्कापोटी लाखो रुपये थकीत आहेत. हे थकीत कंझर्व्हेशन शुल्क माफ करण्याबाबत अर्ज त्यांनी वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांकडे केला आहे.

टॅग्स :Chikhaldaraचिखलदरा