शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते रुंदीकरणात साडेतीन लाख हेक्टर वनजमीन गिळंकृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 20:25 IST

८० हजार कोटींचे नक्त मूल्य थकीत : केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी नाही

अमरावती : राज्यात रस्ते रुंदीकरणात गेल्या ३७ वर्षांत साडेतीन लाख हेक्टर वनजमीन गिळंकृत झाल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाची वाट लागत असताना, वरिष्ठ वनाधिकाºयांनी मात्र वनजमिनींचे नक्त मूल्य वसूल न करता बघ्याची भूमिका बजावली आहे.केंद्र सरकारने वनसंवर्धन कायदा २५ आॅक्टोबर १९८० रोजी लागू करताना वनजमिनींवर रस्त्याची श्रेणीवाढ न करता ‘जैथे थे’ असे स्पष्ट नमूद केले आहे. परंतु, सन १९८० ते २०१७ या दरम्यान रस्ते रुंदीकरण वेगाने झाले. त्यामुळे राज्यात  साडेतीन लाख किमी लांबीच्या रस्त्याचे जाळे विणले गेले. विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ, जिल्हा परिषद बांधकाम, महापालिका बांधकाम विभागाने रस्ते रुंदीकरण करताना वनजमिनीचा वापर केला आहे. वनजमिनींचा वनेतर कामासाठी वापर होत असेल, तर केंद्र सरकारने २९ जानेवारी २०१८ रोजी धोरणात्मक निर्णय जारी करताना संबंधित यंत्रणेकडून व्याजासह दंडात्मक रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राज्याच्या मंत्रालयात सचिव रस्ते असे स्वतंत्र पद असतानासुद्धा वनजमिनींचा रस्ते रुंदीकरणात वापर करण्यात आला आहे. अतिरिक्त वनजमिनींचा वापर केल्यास नक्त मूल्य वसूल करणे ही नियमावली आहे. मात्र, रस्ते रुंदीकरणात साडेतीन लाख हेक्टर वनजमिनीचा अतिरिक्त वापर केल्याप्रकरणी वनविभागाचे ८० हजार कोटी रुपये थकीत आहेत. वनजमीन संज्ञेतील सर्व प्रकारच्या वनजमिनींना रस्ते रुंदीकरणाने बाधा पोहचविली आहे.--------------पंतप्रधान सडक योजनेनंतर रस्ते निर्मितीला वेगकेंद्र सरकारने गाव-खेडी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना राबविली. यादरम्यान वनजमिनींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने रस्ते निर्मिती करून वनजमिनींचा वापर केला. त्यामुळे जंगल, वन्यजिवांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. हल्ली राष्ट्रीय महामार्ग, एक्सप्रेस वेचे १२ वरून ६० मीटर लांब रूंदीकरण होत आहे.

असे करावे लागेल नक्त मूल्य वसूलसर्वोच्च न्यायालयाने सन २००१ मध्ये वनजमिनीचा वनेतर कामासाठी वापर होत असल्याप्रकरणी नक्त मूल्य  वसूल करण्याची नियमावली निश्चित केली आहे. त्यामुळे वनजमिन रस्ते रुंदीकरण प्रकरणी संबंधित यंत्रणेकडून हेक्टरी १० लाख रुपये नक्त मूल्य वसूल करावे लागेल. दुप्पट वृक्षारोपणाचा खर्च, लाकडाची वाहतूक अन्य खर्च यंत्रणेकडून घेणे अनिवार्य आहे. 

सिमेंट काँक्रीटीकरणाचा फटकाकेंद्र सरकारने रस्ते निर्मितीत सिमेंट काँक्रीटीकरणाला प्राधान्य दिले आहे. परिणामी रस्ते रुंदीकरणात वनजमिनीचा वापर होत आहे. चार महिन्यांपूर्वी वरूड ते पांढुर्णा महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरणात वनजमिनींवरील वृक्ष नियमबाह्य कापली आहेत. वृक्षांची मालकी वनविभागाची असताना बांधकाम विभागाने कापलेल्या झाडांच्या लाकडांची विक्रीदेखील केली आहे.