शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

समारंभातील जेवण करा जपूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:16 IST

लग्न समारंभात धूमधाम, मौजमस्ती व आनंद घ्या, पण जेवणाचा स्वाद जरा जपूनच घ्या, अशी म्हणण्याची वेळ अमरावतीकरांसमोर आली आहे. शहरातील काही लग्न समारंभांमध्ये जेवल्यानंतर अन्नातून विषबाधेचा प्रसंग काही जणांवर ओढावला असून, अनेकांना उलट्या व अतिसाराचा त्रासामुळे दवाखान्यात जाण्याची वेळसुद्धा आली आहे.

ठळक मुद्देअन्नातून विषबाधेची शक्यता : उलट्या, अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लग्न समारंभात धूमधाम, मौजमस्ती व आनंद घ्या, पण जेवणाचा स्वाद जरा जपूनच घ्या, अशी म्हणण्याची वेळ अमरावतीकरांसमोर आली आहे. शहरातील काही लग्न समारंभांमध्ये जेवल्यानंतर अन्नातून विषबाधेचा प्रसंग काही जणांवर ओढावला असून, अनेकांना उलट्या व अतिसाराचा त्रासामुळे दवाखान्यात जाण्याची वेळसुद्धा आली आहे.अमरावतीत सध्या लग्नसराईची धूम पाहायला मिळत असून, बहुतांश मंगल कार्यालये दाट लग्नतिथीमुळे फुल्ल आहेत. दररोज शहरातील चारही दिशेने सनई-चौघड्यांची वाजंत्रीचे आवाज, कुठे डीजेचे ताल, नाचत गाजत वराची मिरवणुकीत वºहाडी मंडळी आनंद घेताना दिसत आहे. मात्र, हा आनंद लग्नात जेवण केल्यानंतर निराशेत बदलू शकतो. लग्नसराईचा सिझन असल्यामुळे अनेक कॅटरर्स संचालक एक दिवसांपूर्वी अन्नपदार्थ बनविण्याच्या तयारीत लागतात. दुसऱ्या दिवशी लग्न लागल्यानंतर तेच अन्न वºहाड मंडळींना दिले जाते. आजच्या फॅशनच्या युगात आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्न करण्याची पद्धत रुजू झालेली आहे. लग्नासोबतच अन्न पदार्थ वेगवेगळ्या डिशेश पाहून थक्क होण्याची वेळ येऊ लागली आहे. या अन्नपदार्थांपैकी काही दुग्धजन्य पदार्थाच्या मेजवानीचे वेगवेगळे स्टॉलसुद्धा सजविले जाते. सर्वसाधारण पोळी, भाजी, वरण, भात सारखे अन्न जेवणात असतात. सकाळी शिजविलेले अन्न रात्रीच्या वेळेत खाण्यात आल्यास ते पचनी पडते. मात्र, ते अन्न शिळे असल्यास विषबाधेचा त्रास जाणवतोच. याशिवाय अन्य आकर्षक दुग्धजन्य अन्न पदार्थांचा स्वाद घेण्यास अनेक जण इच्छुक असतात. त्याच पदार्थांवर सर्वाधिक ताव वºहाडी मंडळी मारत असतात. मात्र, जर शिळे दुग्धजन्य पदार्थ खाण्यात आल्यास विषबाधेचा प्रभाव अधिक जाणवतो. शहरात लग्नसराईत काही मंगल कार्यालये व लॉनमधील कार्यक्रमातील जेवण करून घरी गेल्यानंतर अनेकांना उलट्यांचा व अतिसाराचा त्रास जाणवला आहे. नाव न छापण्याच्या अटीवर लग्न वºहाडींनी आपली व्यथा ‘लोकमत’समोर मांडली. शुक्रवारी रात्री बडनेरा रोडवरील एका लॉनमधील कार्यक्रम आटोपून घरी पोहोचलेल्या नागरिकांना मळमळ, उलट्या व अतिसाराचा मोठा त्रास जाणवला. त्यांनी आपआपल्या फॅमीली डॉक्टरांकडे धाव घेऊन उपचार केलेत. उलट्या करून अदमुसे झाल्याच्या स्थितीपर्यंत अनेकांची प्रकृती खालावल्याचेही आढळून आले आहे.नोंदणीकृत परवानाधारक असल्याची शहानिशा कराशहरात शेकडोंच्या संख्येने कॅटरर्स चालविणारे असून, त्यापैकी काहीच कॅटरर्सने अन्न व औषधी प्रशासनाकडे नोंदणी करून अधिकृत परवाना घेतला आहे. ज्या कॅटरर्स संचालकांकडे एफडीएचा परवाना आहे, अशाच कॅटरर्सना जेवण तयार करण्याची आॅर्डर दिल्यास ते जेवणाबाबत योग्य ती काळजी घेऊ शकतात. अनधिकृत कॅटरर्स संचालक खाद्य पदार्थ तयार करण्यात हयगय करू शकतात. अन्न पदार्थाविषयी अनधिकृत कॅटरर्स चालक हवी तशी तसदी घेत नाही. अशाप्रसंगी शिळ्या अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी परवानाधारक कॅटरर्स असल्याची खात्री करूनच जेवण तयार करण्याची आर्डर द्यावी, असे आवाहन एफडीए सहायक आयुक्त एस.डी. केदार यांनी केले आहे.ही आहेत लक्षणेशिळे किंवा दूषित अन्नपदार्थ खाण्यात आल्याने मळमळ, उलट्या, हातपाय थरथर कापणे, अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात.अशी घ्यावी काळजीअन्नातून विषबाधा झाल्यास सर्वप्रथम जड अन्न खाणे बंद करा. इलेक्ट्राल पावडरयुक्त पाणी अधिक प्यावे. हलके अन्न ग्रहण करावे, जसे वरण-भात, सोजी व फळे. हा त्रास कमी होत नसल्यास डॉक्टरांच्या सल्लाने औषधोपचार घ्यावा, अशी माहिती उदरविकार तज्ज्ञ उज्वल बारंगे यांनी दिली.लग्न समारंभ वैयक्तिक असल्यामुळे संबंधित व्यक्तीनेच काळजी घेणे आवश्यक आहे. लग्नसमारंभाच्या आयोजकांनी नोंदणीकृत परवानाधारक कॅटरर्स असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. कॅटरर्सला वेळोवेळी सूचना देतो.- एस.डी. केदारसहायक आयुक्त (अन्न)लग्नातील जेवणात बुफे पार्टीत वेगवेगळ्या पदार्थाचा स्वाद घेतला आहे. मात्र, काही वेळा पोट दुखण्यासह उलट्यांचाही त्रास जाणवला आहे. आपल्या परिचयातील लग्न असल्यामुळे तक्रार करावी तरी कोणाकडे, असा पेच अशावेळी पडतो.- राजेश जगतापनागरिक.लग्न समारंभातील जेवण चांगले असेल, या भावनेतून आपण जेवण करतो. मात्र, जेवल्यानंतर अनेकदा पोटाचा त्रास जाणवला आहे. कारणे काहीही असोत, पाहुणे मंडळींना चांगले अन्न मिळायलाच हवे.- संदीप तेलखेडेनागरिकशिळे अन्न खाण्यात आल्यास पचनक्रिया मंदावते. उलट्या, मळमळ, अतिसाराचा त्रास जाणवतो. सध्या लग्न सराईत हे प्रमाण वाढले असून, दररोज पाच ते सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.- उज्ज्वल बारंगेउदरविकार तज्ज्ञ.