शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

चार जुलैला सूर्यापासून पृथ्वीचे अंतर १५२ दशलक्ष किमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:23 IST

पृथ्वी-सूर्याचे सरासरी अंतर १५ कोटी किमी. असते. मात्र, दर चार वर्षांनी ४ जुलै रोजी पृथ्वीपासून सूर्याचे सर्वाधिक अंतर १५२ दशलक्ष किमी राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात 'अ‍ॅपीहेलिऑन' म्हणजे अपसूर्य असे म्हणतात.

ठळक मुद्दे सरासरी अंतर १५ कोटी किमी'अ‍ेपिहेलिऑन'

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पृथ्वी-सूर्याचे सरासरी अंतर १५ कोटी किमी. असते. मात्र, दर चार वर्षांनी ४ जुलै रोजी पृथ्वीपासून सूर्याचे सर्वाधिक अंतर १५२ दशलक्ष किमी राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात 'अ‍ॅपीहेलिऑन' म्हणजे अपसूर्य असे म्हणतात. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्याने अशी घटना घडत असते.सूर्य हा तप्त वायूचा गोळा असून, यात हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र सुरू राहते. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळते. त्यापासून ६५ कोटी २५ लाख टन हेलियम तयार होते. कमी झालेल्या ४५ लाख टन वस्तूमानाचे रुपांतर सौर ऊर्जेत होते. सूर्यावरील ज्या भागाचे तापमान कमी होते त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असतात. या डागाचा शोध सन १८४३ मध्ये श्वाबे या वैज्ञानिकाने लावला. या डागाचे आतापर्यंत २३ चक्र पूर्ण झाले आहेत. फेब्रुवारी २००८ पासून २४ वा चक्र सुरू झाले असून, मानवनिर्मित उपग्रहावर या डागाचा परिणाम होत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.एक लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे एक सेमीने ओढली जातेयजग पाच खंडांत व्याप्त असून, हळूहळू ही पृथ्वी सूर्याकडे सरकू लागली आहे. दर एक लाख वर्षांनी एक सेंटीमीटरने ती सूर्याकडे ओढली जात आहे. न्यूयॉर्क शहर लंडनपासून दरवर्षी २.५ से.मी. दूर सरकल्याचे संशोधन नुकतेच पुढे आल्याचे हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

पाच अब्ज वर्षांनी सूर्याचे बटुक ताऱ्यात रुपांतरसूर्याचे वय १० अब्ज वर्ष वैज्ञानिक सर ऑर्थर एडींग्टन यांनी निश्चित केले आहे. त्यापैकी ५ अब्ज वर्षे निघून गेले असून, उर्वरित पाच अब्ज वर्षानंतर सूर्याचे अंत होऊन बटू ताऱ्यात रुपांतर होईल. सूर्याकडून चुंबकीय लहरी फेकºया जात असल्याने कधी-कधी चुंबकीय वादळे आल्याचे सांगण्यात आले आहे. सन १८५९ मध्ये ते वादळ आल्याने जगातील टेलीग्राफ यंत्रणा बंद पडल्याची खगोलशास्त्रात नोंद आहे. या वादळाला 'केरीगटन' इव्हेंट' हे नाव दिले होते. या वादळाने सॅटेलाईट, जीपीएस यंत्रणा पूर्णपणे बंद पडतात.४ जुलैला पृथ्वी-सूर्य हे अंतर अधिक असण्याचा सजीव सृष्टीवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. मात्र, सूर्याकडे साध्या डोळ्यांनी थेट पाहिल्यास धोका संभवण्याची शक्यता आहे.- विजय गिरुळकर, हौशी खगोल अभ्यासक, अमरावती

टॅग्स :Earthपृथ्वी