शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 10, 2023 12:40 IST

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन वॉर्ड इमारत, तसेच आकस्मिक अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन

अमरावती : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथील पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्र. जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन वॉर्ड इमारत, तसेच आकस्मिक अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यांनी रुग्णालयातील विविध सुविधांची पाहणी केली.

उपमुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी दीपस्तंभासारखे काम केले. ते दूरदर्शी व द्रष्टे होते. समाजाला त्यांनी शिक्षणाची दिशा दिली. भाऊसाहेबांनी दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन भरवून कृषी व संलग्न क्षेत्रांना विकासप्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणले. त्यांनी कृषी क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे.१२५ वे जयंती वर्ष शासनाचे वतीने साजरे करणार

यंदा डॉ. पंजाबरावं देशमुख यांचे १२५ वे वर्ष जयंती वर्ष आहे. हे वर्ष शासनाच्या वतीने साजरे करण्यात येईल. पापळ येथे याच वर्षात कृषी महाविद्यालय निर्माण केले जाईल. स्मारकासाठी आवश्यक तरतूद करण्यात येईल. संस्थेच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :SocialसामाजिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhospitalहॉस्पिटलAmravatiअमरावती