शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

ज्वालाग्राही रासायनिक द्रव्यामुळे लाल शाळेला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:03 IST

ऐतिहासिक आणि वैभव संपन्नतेचा वारसा असलेल्या येथील नेहरू मैदानातील लाल शाळेला लागलेली आग ज्वालाग्राही रासायनिक द्रव्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष त्रिसदस्यीय समितीने काढला आहे.

ठळक मुद्देघातपात फेटाळला : त्रिसदस्यीय समितीचा प्राथमिक निष्कर्ष

ऑनलाईन लोकमतअमरावती : ऐतिहासिक आणि वैभव संपन्नतेचा वारसा असलेल्या येथील नेहरू मैदानातील लाल शाळेला लागलेली आग ज्वालाग्राही रासायनिक द्रव्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष त्रिसदस्यीय समितीने काढला आहे. महापालिका उच्च प्राथमिक शाळेच्या ज्या प्रयोगशाळेच्या खोलीला आग लागली. तेथील विद्युत पुरवठा खंडित होता. त्यामुळे शॉर्ट सर्किटच्या शक्येतेसह घातपाताची शक्यता समितीने नाकारली आहे.उपायुक्त नरेंद्र वानखडे, शिक्षणाधिकारी डी. यू. गावंडे आणि अग्निशमन अधीक्षक भारतसिंग चौव्हाण या त्रिसदस्यीय समितीने त्यांचा चौकशी अहवाल १३ मार्च रोजी आयुक्तांना सुपूर्द केला. तो अहवाल २० मार्चच्या आमसभेत ठेवण्यात आला. मात्र, दुपारी सभा स्थगित करण्यात आल्याने अहवालावर चर्चा होऊ शकली नाही.नेहरू मैदानस्थित महापालिका माध्यमिक मुलांच्या शाळेला १४ फेब्रुवारीला सायंकाळी ७ ते ७.१५ च्या सुमारास आग लागली. यात प्रयोगशाळेच्या खोलीसह छत व अन्य साहित्य भस्मसात झाले. रात्री १२ च्या सुमारास आग आटोक्यात आली. त्यात सुमारे २ लाख रूपयांचे नुकसान झाले. मात्र त्याच दिवशी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला, तर घातपाताची चर्चा पाहता सर्वपक्षीय महापालिका पदाधिकाऱ्यांनी आगीच्या चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली. आग लावून इमारत नादुरूस्त ठरवायची व शिकस्त म्हणून पाडून तेथे मॉलची उभारणी करावी, या हेतूने आग लावण्यात आल्याचा आरोप होता. त्याअनुषंगाने आयुक्तांनी १५ फेब्रुवारीस वानखडेंच्या नेतृत्वात त्रिसदस्यीय समिती नेमली. त्या समितीने या तीनही शाळेचे मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, टाऊन हॉलचे शिपायांसह संबंधितांचे बयाण नोंदविले. पोलीस पंचनामा विचारात घेतला व त्यानंतर तेथील आग ज्वालाग्रही रासायनिक द्रव्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. शाळा कुलूपबंद केल्यानंतर ज्या ठिकाणी आग लागली. त्या प्रयोगशाळेच्या हॉलपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने व तेथील वीज पुरवठा खंडित असल्याने घातपाताची शक्यता नाकारण्यात आली आहे. या निष्कर्षामुळे घातपाताचा शक्यतोवर पडदा पडला आहे.शाळेच्या प्रयोगशाळेत उंदरांचा सुळसुळाटलालशाळेच्या प्रयोगशाळेत उंदरांची संख्या जास्त आहे. लाकडी वस्तू पण आहेत. प्रयोगशाळेत सल्फ्यूरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, स्पिरीट, सोडियम सल्फेट, स्पिरीट ग्लिसरीन, सोडीयम यासारखी स्फोटक ज्वालाग्रही पदार्थ असल्याने आग लागण्याची शक्यता असू शकते, असा अंदाज तेथील विज्ञान शिक्षकांनी त्यांच्या अहवालात नोंदविला आहे.असे झाले होते नुकसानप्रयोगशाळेच्या मोठ्या हॉलसह आजूबाजूच्या दोन वर्गखोल्या खाक, आलमाºया २०, लोखंडी आलमारी ०२, लोखंडी ट्रंक ०१, रासायनिक साहित्य पूर्ण, मायक्रोस्कोप, टाईपरायटर जुने, प्रोजेक्टर जुना, एम्प्लीफायर, लाऊडस्पिकर, प्रात्यक्षिक साहित्य, दरवाजे, खिडक्या, स्टुल २०, टेबल ८, एकंदरीत संपूर्ण दोन्ही प्रयोगशाळा जळून नष्ट झाल्या.

टॅग्स :fireआग