शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

हवाई सर्वेक्षण सुरू झाल्याने आदिवासींमध्ये दाटली भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:39 IST

तालुक्यातील अनेक गावांत बुधवारी दुपारी ३ वाजेपासून सायंकाळपर्यंत हेलिकॉप्टरने अगदी कमी उंचीवरून घिरट्या घातल्या. त्यामुळे आदिवासींमध्ये भीती दाटली होती. तापी धरणाच्या हवाई सर्वेक्षणाचे वृत्त हाती येताच चर्चांना विराम लागला.

ठळक मुद्देहेलिकॉप्टरच्या धारणी परिसरात पाच तास घिरट्या : तापी धरणाच्या कामाला मध्य प्रदेशातून गती

श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यातील अनेक गावांत बुधवारी दुपारी ३ वाजेपासून सायंकाळपर्यंत हेलिकॉप्टरने अगदी कमी उंचीवरून घिरट्या घातल्या. त्यामुळे आदिवासींमध्ये भीती दाटली होती. तापी धरणाच्या हवाई सर्वेक्षणाचे वृत्त हाती येताच चर्चांना विराम लागला. मात्र, या कामाला मध्य प्रदेशातून गती मिळाल्याच्या वार्तेने या आदिवासी क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले आहे.मेळघाटातील धारणीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील खाऱ्या गावाजवळ पूर्व-पश्चिम वाहणाºया तापी नदीवरधरणाचे काम सुरू असले तरी या कामाला विरोध होत असल्यामुळे प्रत्यक्षात धारणी तालुक्यात कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय न घेता, संपूर्ण प्रक्रिया मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आणि खान्देशातून सुरू आहे. विशेष म्हणजे, धारणी तालुक्यातील खाऱ्या, घुटीघाट परिसरात तापी नदीवर बहुप्रतीक्षित तापी धरणाचे कामाचे हवाई सर्वेक्षण सुरू होण्याची बातमी १३ आॅगस्टला ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीतून १३ आॅगस्टला प्रसिद्ध झाली. याबाबत होणाऱ्या कार्याची प्रगती बऱ्हाणपूर किंवा जळगाव येथून प्रकाशित होणाºया विविध वृत्तपत्रांमधून मेळघाटवासीयांना वाचावयास मिळत आहे. धारणी तालुक्यात मात्र धरणाबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात येत आहे.असंतोष वाढलाप्रकल्पस्थळ धारणी तालुक्यातील खाऱ्या या गावाजवळ, तर धरणाबाबत होणाऱ्या प्रत्येक निर्णयाचे सूत्र मध्य प्रदेशातील मंत्री अर्चना चिटणीस आणि महाराष्ट्रात गिरीश महाजन यांच्याकडे आहे. मेळघाटाला प्रकल्पाबाबत होणाऱ्या सर्व माहितीपासून अलिप्त ठेवले आहे. मेळघाटातील एकही गाव पाण्याखाली येणार नाही ही घोषणा फोल तर ठरणार नाही ना, अशी भीती आदिवासींमध्ये असंतोष वाढला आहे.जळगावातून धरणाच्या हालचालीखान्देशातील गिरीश महाजन यांनी या योजनेला गती दिली. त्यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी बºहाणपूर येथे जाऊन भाजपच्या आमदार यांच्याशी संपर्क साधून तापी धरणाच्या कामाच्या अंमलबजावणीचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्याअनुषंगाने १५ आॅगस्ट रोजी हवाई सर्वेक्षण सर्वेक्षणासाठी हेलिकॉप्टरने घिरट्या घातल्या.नेपानगरचे आमदार सक्रियनेपानगर येथील आमदार आणि मंत्री अर्चना चिटणीस यांच्या प्रयत्नाने या प्रकल्पाला युद्धस्तरावर गती दिली जात आहे. धारणीच्या अवकाशात १५ आॅगस्ट रोजी पाच तासापर्यंत हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते. ते १४ किलोमीटर अंतरावरील मध्यप्रदेशातील देडतलाई गावात शाळेच्या प्रांगणात उतरविण्यात आले. विरोधच होऊ नये, यासाठी गुप्तता पाळली जात आहे.आघाडी शासनाचा होता तीव्र विरोधतत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांनी हवाई सर्वेक्षणाची घोषणा केली होती. त्यांनी तापी प्रकल्पाबाबत धारणीत प्रकल्प अधिकारी कार्यालयात जाहीर सभा घेतली होती. या सभेमध्ये उपस्थितांनी तापी धरणाच्या निर्मितीमुळे आदिवासी संस्कृती नष्ट होण्याची भीती व्यक्त करून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. भाजपचे तत्कालीन आमदार राजकुमार पटेल यांनी सर्वेक्षण अधिकाºयांना पळवून लावत निशाणाकरिता झेंडे उखडून टाकले होते.

टॅग्स :Tapi riverतापी नदीDamधरण