शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘आॅनलाईन’च्या सक्तीमुळे ‘पणन’ची केंद्रे ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:21 IST

जिल्ह्यात पणन महासंघाची सहा व सीसीआयची दोन केंद्रे सुरू झाली. मात्र, उद्घाटनाला कापसाचे बोंडही मिळाले नाही.

ठळक मुद्देशेतकºयांची धाव व्यापाºयांकडे : कापसाला दोन्ही ठिकाणी भाव सारखाच

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात पणन महासंघाची सहा व सीसीआयची दोन केंद्रे सुरू झाली. मात्र, उद्घाटनाला कापसाचे बोंडही मिळाले नाही. खुल्या बाजारात शासन केंद्राइतकाच भाव मिळत असताना केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्थींचा भडीमार असल्यानेच शेतकºयांनी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे. केवळ अंजनगाव सुर्जी केंद्रावर मुहूर्ताला ३० क्विंटल कापूस मिळाला. आतापर्यंत आठ केंद्रांवर केवळ १६ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असल्याचे वास्तव आहे.यंदा अमरावती, अचलपूर, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, तिवसा व वरूड या केंद्रांवर २५ आॅक्टोबरपासून कापसाची खरेदी सुरू झाली. मात्र अंजनगाव सुर्जी वगळता या केंद्रांवर आतापर्यतची खरेदी निरंक आहे. हीच स्थिती सीसीआयची आहे. चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे केंद्रांवर खरेदी सुरू करण्यात आली असताना शेतकºयांची मात्र पाठ आहे. यंदा पणनला स्वतंत्रपणे कापूस खरेदीची परवानगी नाकारली. सीसीआयची अभिकर्ता म्हणूून खरेदीची परवानगी दिली. सध्या ६ केंद्रांवर पणन महासंघाद्वारा कापूस खरेदीचा शुभारंभ केला. तूर्तास शेतकºयांवर कापूस नाही, ज्यांच्याकडे कापूस आहे तो शेतकरी केंद्रावरील अटी व शर्तीमूळे खुल्या बाजारात वळला आहे.बोनस देण्याची घोषणा, पूर्तता नाहीचराज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी कापसाला किमान ५०० रूपये बोनस देण्याची घोषणा केली होती. अद्यापही या घोषणेची पूर्तता नाहीच. गुजरात सरकारने कापूस उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला आहे. राज्यात अशीच स्थिती राहिल्यास कापूस व कापड उद्योगांवर संक्रांत येणार आहे.नोंदणीसाठी अटी-शर्तींचा भडीमारपणनच्या कापूस खरेदी केंद्रांवर कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकºयांना बाजार समितीमध्ये आॅनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी शेतकºयांना सातबारा, बँकेचे खाते क्रमांकासह अधारक्रमांकही द्यावा लागणार आहे. यामध्ये कापसात आठ ते १२ टक्क्यांपेक्षा आर्द्रता नको, हेदेखील निकष आहे. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी कापसाचे पेमेंट एका आठवड्यात देण्याचे आश्वासन दिले असले तरी केंद्रांवर अटी व शर्तींचा भडीमार असल्यानेच शेतकºयांचा कल व्यापाºयांकडे आहे.असा आहे हमीभाव अन् खासगीत भावयंदाच्या हंगामात कापसाच्या वाणानुसार हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या स्टेपलमध्ये ४,३२० व दुसºया स्टेपलमध्ये ४,२२० रुपये प्रतिक्विंटल असा दर जाहीर करण्यात आलेले आहेत. खासगी बाजारात एक नोव्हेंबरला विक्री झालेल्या कापसानुसार अमरावतीला सरासरी ४००० रूपये, धामणगाव रेल्वे ४२००, अचलपूर ४३५० तर धारणी येथे ४०५० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे