शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अमरावती जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 16:49 IST

पावसाने दीर्घ दडी मारल्याने परिसरातील अडीचशेवर गावे आणि दर्यापूर-अंजनगाव शहरांना पाणीपुरवठा करणा-या शहानूर प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.

अंजनगाव सुर्जी, दि. 2 - ऑगस्ट महिन्यात पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याची भरीव आवक धरणात येणे आवश्यक होते, पण पावसाने दीर्घ दडी मारल्याने परिसरातील अडीचशेवर गावे आणि दर्यापूर-अंजनगाव शहरांना पाणीपुरवठा करणा-या शहानूर प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. तशा स्पष्ट सूचना जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपलवार यांनी कनिष्ठ अभियंत्यांना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याच्या सूचना ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. 

त्यानुसार या विभागाने धरणातील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पुरवठ्यावर आचारसंहिता लावण्याचे निश्चित केले आहे. सप्टेंबर महिन्यात जर पुरेशी आवक झाली नाही तर या धरणातून होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्याचे विभागाने निश्चित केले आहे. दिनांक २८ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा व जलसिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी धरणाची पाहणी करून हा निर्णय घेतला आहे. 

यावर्षी ऑगस्ट महिन्यात या धरणातील पाण्याची पातळी फक्त एक मीटरने वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने सलग २५ दिवसांची दडी मारल्याने धरणाच्या क्षेत्रात वाढलेली पातळी तीन वर्षांच्या तुलनेत नगण्य आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये ४३ दशलक्ष घनमीटरचा पाणीसाठा आॅगस्ट २०१५ मध्ये ३८ दशलक्ष घनमीटर झाला होता. ऑगस्ट २०१६ मध्ये त्यात समाधानकारक वाढ झाली. परंतु यावर्षी पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात धरणात फक्त ३३ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. त्यादृष्टीने पाण्याचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे. 

यावर्षी शहानूर नदीला एकही पूर गेला नाही. ज्या चिखलदरा तालुक्यातून नदीचा उगम आहे तेथे सर्वात कमी पाऊस पडला. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याची एकदाही वेळ आली नाही. अन्यथा दरवर्षी जास्तीचे पाणी धरणातून सोडून पाण्याच्या पातळीचे नियोजन केले जाते. 

पाणीपुरवठा विभाग नियोजनाच्या तयारीतजलशुद्धीकरण केंद्रातून केला जाणारा पाणीपुरवठा व त्याची देखभाल दुरूस्ती यासाठीसुद्धा वेळ आवश्यक आहे. त्यात यावर्षी पाणी साठ्यातील झालेली चिंताजनक घट यामुळे अधिकाºयांनी नियोजन करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. अधिकारी वर्ग आवश्यक त्या उपाययोजना करीत असून प्रसार माध्यमांनासुद्धा याबाबत प्रसिद्धी देण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

धरणात पुरेसा पाणीसाठा

पावसाचे प्रमाण कमी असले तरी परतीचा पाऊस जाण्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दमदार हजेरीने नदी जिवंत झाली असून पाण्याची आवक समाधानकारक होईल, असे वाटते. निर्णय वरिष्ठ अधिकाºयांनी घ्यावयाचे असल्यामुळे त्यांची अंमलबजावणी आमच्यावर बंधनकारक आहे. - सुमित हिरेकर, शाखा अभियंता, शहानूर प्रकल्प, अंजनगाव