शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मागणी नसल्याने संत्रा उत्पादकांचे स्वप्न भंगणार !

By admin | Updated: July 11, 2016 00:12 IST

तालुक्यात संत्रा कलमांच्या विक्रीतून शेतकऱ्यांकडे लाखो रुपये येत होते. परंतु तालुक्यात संत्रा कलमांची निर्मिती...

फटका : संत्रा कलमा शिलकीची शक्यता, नर्सरीधारकांवर चिंतेचे सावटवरुड : तालुक्यात संत्रा कलमांच्या विक्रीतून शेतकऱ्यांकडे लाखो रुपये येत होते. परंतु तालुक्यात संत्रा कलमांची निर्मिती सव्वा कोटींच्याजवळ असूनही मागणी नसल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संत्रा कलमा उत्पादकांचे स्वप्न भंग पाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी समाधानकारक पाउस पडल्यास संत्रा कलमा उत्पादकांना सुगीचे दिवस येतील, असा अंदाज वर्तविला जात असला तरी भाव हे १५ ते २० रुपये प्रति कलम मिळत असल्याने उत्पादन खर्च काढणे कठीण आहे. शासनाने फलोत्पादन योजनेचे परमीट देणे बंद केल्याने शासकीय खरेदी बंद आहे. शासनाची अनास्था आणि राजाश्रय नसल्याने संत्रा कलमा उत्पादकांची फरफट सुरू असल्याने नर्सरीधारकांचा व्यवसाय मोडीत निघण्याची शक्यता उत्पादकांकडून वर्तविण्यात येत आहे. कलमा निर्मितीची प्रक्रियानोव्हेंबर ते जानेवारीमध्ये डोळे बांधणी केली जाते. सदर्हू रोपटे ८ ते ९ इंच अंतरावर शेतामध्ये लावले जाते. त्यावर दोन ते ३ वर्षांच्या संत्रा झाडावरील डोळा (कलम) काढून ते या रोपट्यावर चढविले जाते. जंभेरीच्या रोपट्यावर संत्राकरिता रंगपूर लाईम, मोसंबीकरिता न्युसेलर हैद्राबादी, गावरानी कलम चढविले जाते. जूनपासून या कलमाची जोपासना केली जाते. या कलमाची वाढ होण्यास आणि विक्रीस उपलब्ध होईपर्यंत दीड वर्षांचा अवधी लागतो. अशापद्धतीने संत्रासह लिंबूवर्गीय कलमा शास्त्रोक्त पद्धतीने कलमांची निर्मीती होते. संत्रा कलमा तयार करण्याकरिता १२ ते १५ रुपये खर्च येतो. यावर्षी संत्रासह निंंबूवर्गीय कलमाचे सुमारे दीड ते दोन कोटींच्या घरात उत्पादन आहे. कृषी विभागाने डी.एन.ए चाचणी करूनच संत्रा, मोसंबी आणि लिंंबूवर्गीय कलमांचे उत्पादन केले जाते. कलमांच्या खरेदीकरिता राजस्थान, मध्यप्रदेशासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येतात. विविध राज्यांच्या कृषि विभागाच्यावतीने येथून परवान्यावर खरेदी केली जाते. यातून जून ते सप्टेंबरपर्यंत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. तालुक्यात २७५ परवानाधारक नर्सरी तर तेवढेच विनापरवाना संत्रा कलमा निर्मिती करणारे आहे. शेतजमिनीमध्ये (विघा) २० आर पासून तर ४०-५० आर जमिनीवर लागवड केली जाते. यावर्षी दीड ते दोन कोटी संत्रा कलमा निर्मीचे कार्य नर्सरीधारक करीत आहे. विदर्भाचा कॅलीफोर्निया म्हणून नावलौकीक मिळविलेल्या वरुड तालुक्यावर नैसर्गिक ते कृत्रिम असे संकट सातत्याने येत असते. यावर्षी नोव्हेंबरपासून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जंभेरीवर डोळा लावण्याचे काम झाले. शासकीय खरेदी फलोत्पादन योजनेअंतर्गत परवानावर कलमाचे प्रती कलम दर २५ रुपये आहे. शासकीय दरानुसार २५ रुपये भाव मिळतो, तर खासगी खरीददार ३० ते ४० रुपयांना कलमा विक्री करतात. परंतु गत वषर्भपाूसन भाव पडल्याने कलमा उत्पादक अडचणीत येत आहे. नर्सरीधारकांना लाखोंचा फटका बसण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)