दिवाळसणाच्या पर्वावर तुपामध्ये भेसळ ?

By admin | Published: October 22, 2014 11:12 PM2014-10-22T23:12:36+5:302014-10-22T23:12:36+5:30

दुधाची कमतरता आणि जादा पैसे कमाविण्याच्या मोहात सध्या अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात भेसळयुक्त गावराण तुपाची विक्री वाढली आहे. वनस्पती तूप आणि रव्याचा वापर करुन गावराण तुपाची

Due to bankruptcy? | दिवाळसणाच्या पर्वावर तुपामध्ये भेसळ ?

दिवाळसणाच्या पर्वावर तुपामध्ये भेसळ ?

Next

अचलपूर : दुधाची कमतरता आणि जादा पैसे कमाविण्याच्या मोहात सध्या अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात भेसळयुक्त गावराण तुपाची विक्री वाढली आहे. वनस्पती तूप आणि रव्याचा वापर करुन गावराण तुपाची विक्री करणारी टोळी अचलपूर-परतवाड्यात फिरत आहे. काही डेअरी चालकांकडूनही ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
दिवाळीत फराळाचे साहित्य बनविण्यासाठी अनेक जण गावराण तुपाचा वापर करतात. त्यामुळे काही दिवासांपासून तुपाची मागणी वाढली आहे. त्याचा फायदा घेत खेड्यापाड्यातील काही विक्रेते अचलपूर-परतवाड्यात दुग्धजन्य पदार्थांची विक्री करीत आहेत. बहुतांश ठिकाणी वनस्पती तुपात रवा आणि अन्य पदार्थांची भेसळ करुन विक्री केली जाते. अशाप्रकारे तयार केलेले तूप आरोग्यास अपायकारक असते. शिवाय त्यामुळे अनेकांना आर्थिक फटकाही बसला आहे. ७० टक्के वनस्पती व ३० टक्के गावराणी आणि एक किलो तुपात ३०० ग्रॅम वनस्पती तूप टाकून भेसळ करण्याचे प्र्रकार वाढले आहेत. गेल्या वर्षीही मध्यप्रदेशामधून येणाऱ्या माव्यात भेसळ होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले होते.

Web Title: Due to bankruptcy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.