शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या नशेत पोलिसाचा एसटी बसमध्ये धिंगाणा, निलंबनाची कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: August 28, 2022 21:20 IST

अक्षय बेलसरे ग्रामीण पोलिस दलात असून तो सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होता

अमरावती : दर्यापूर ते अमरावती बसमध्ये धिंगाणा घालणाऱ्या एका पोलिसाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली होती. त्याप्रकरणाचा अहवाल येताच त्याचेवर शनिवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. अक्षय बेलसरे असे निलंबित पोलीस अंमलदाराचे नाव आहे.

अक्षय बेलसरे ग्रामीण पोलिस दलात असून तो सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. शुक्रवारी गणवेष घालून बेलसरे खोलापूर बसस्थानकाहून एसटी बसमध्ये चढला. बस धावू लागल्यानंतर त्याने दारुच्या नशेतच बसमधील वाहक, प्रवाशांकडे पाहत, हातवारे करुन अश्लील शिवीगाळ सुरू केली. त्याला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाही तो शिवीगाळ करत होता. अखेर बस चालकाने प्रवाशांसह बस खोलापूर पोलीस ठाण्यात आणली व अक्षय बेलसरेला पोलिसांच्या स्वाधिन केले. त्यानंतर बस पुढील प्रवासाला निघाली. दरम्यान खोलापूरचे ठाणेदार संघरक्षक भगत यांनी तत्काळ या पोलिसांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्याच्या शरीरातील रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओसुध्दा सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची दखल घेवून पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अक्षय बेलसरेला निलंबित केले आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिसBus Driverबसचालक