शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी मुलाने वडिलांच्या गळ्यावर चालविला सत्तूर

By प्रदीप भाकरे | Updated: March 8, 2023 12:49 IST

मार्की येथील घटना : हत्येप्रकरणी मुलाला अटक, होळीला गालबोट 

अमरावती: होळीच्या दिवशी रात्री गावातील चौकात दारू पिऊन धुडगुस घालणाऱ्या मुलाने त्याला हटकणाऱ्या जन्मदात्याच्या गळ्यावर सत्तूर चालविला. यात ते वृद्ध वडिल जागीच गतप्राण झाले. भातकुली तालुक्यातील मार्की येथे ६ मार्च रोजी रात्री ११.३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. सुरेश देशमुख (७५, रा. मार्की) असे मृत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या धाकट्या मुलाच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी आरोपी मुलगा गोपाळ सुरेश देशमुख (४०, रा. मार्की) याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला त्वरेने अटक केली. याप्रकरणी ७ मार्च रोजी सकाळी ९.४६ च्या सुमारास एफआयआर नोंदविण्यात आला.

तक्रारीनुसार, आरोपी गोपाळ देशमुख हा ६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास दारू पिऊन गावातील चौकात जोरजोराने शिवीगाळ करीत होता. ही बाब गावकऱ्यांनी त्याचे वडिल सुरेश देशमुख यांना सांगितली. त्यामुळे ते मुलाला समजावून घरी आणण्यासाठी चौकात गेले. तू नेहमीच भांडण करत असल्याने आमची गावात बदनामी झाली आहे. बेअब्रू झाली आहे. त्यामुळे तू शिवीगाळ करू नकोस, असे सुरेश देशमुख यांनी सर्वांसमक्ष त्याला बजावले. त्यावेळी म्हाताऱ्या तुला बघून घेतो, असे म्हणून गोपाळ तेथून निघून गेला.अशी घडली घटना६ मार्च रोजी रात्री ११.३० च्या सुमारास सुरेश देशमुख हे धाकटा मुलगा अमोल (३५) याच्यासह घरी बसलेले असताना आरोपी गोपाळ घरी आला. माझ्यामुळे तुझी इज्जत गेली का, अशी विचारणा करत त्याने वडिल सुरेश देशमुख यांच्या गळ्यावर लोखंडी सत्तरने वार केला. यात ते घटनास्थळीच ठार झाले. त्यावेळी अमोलने मोठ्या भावास अडविले. त्याला वडिलांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लहान भावाला ठार मारण्याची धमकी देत आरोपी घरातून पसार झाला. दरम्यान, सुरेश देशमुख यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी