शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कारमधून ९६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; चालकास अटक

By प्रदीप भाकरे | Updated: January 9, 2023 16:47 IST

राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमरावती : राजापेठ पोलिसांनी एका कारमधून सुमारे ९६ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ९ जानेवारी रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. कारसह गुटखा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी कारचालक तुषार सुनिल नानवाणी (२१, रा. कंवर नगर) याला अटक करण्यात आली आहे.

एक इसम हा एमएच ३३ ए २५७१ या कारमधून प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतुक करत असून तो दस्तुर नगर ते फरशी स्टॉप रोडने पुढे जात असल्याची गोपनिय माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार, राजापेठ डीबी पथकाने सापळा रचत त्या वाहनाला थांबवून झडती घेतली असता, त्यात सुमारे ९६ हजार रुपये किमतीचा विविध कंपनीचा गुटखा माल आढळून आला. घटनास्थळाहून दोन लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली. तर, आरोपी तुषार नानवाणीविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहाय्यक पोलीस आयुक्त पुनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनिष ठाकरे, पोलीस उपनिरिक्षक काठेवाडे, अंमलदार मनिष करपे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTobacco Banतंबाखू बंदीAmravatiअमरावती