शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सपन प्रकल्पात पाणी असूनही सिंचन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:42 IST

अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पावर (धरण) आपात्कालीन स्थितीत धरणाचे दरवाजे उघड-बंद करण्यासाठीचे आवश्यक जनरेटर बंद पडले आहे. प्रकल्पात पाणी असूनही मागील सात वर्षांपासून प्रकल्पावर सिंचन नाही, तर प्रकल्पावर सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे जवळपास ४६० कोटींचा हा प्रकल्प वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देदरवाजे उघडण्याकरिता जनरेटर बंद : सुरक्षा यंत्रणा नाही, प्रकल्प वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पावर (धरण) आपात्कालीन स्थितीत धरणाचे दरवाजे उघड-बंद करण्यासाठीचे आवश्यक जनरेटर बंद पडले आहे. प्रकल्पात पाणी असूनही मागील सात वर्षांपासून प्रकल्पावर सिंचन नाही, तर प्रकल्पावर सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे जवळपास ४६० कोटींचा हा प्रकल्प वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.अचलपूर तालुक्यातील वझ्झर गावाजवळ असलेल्या सपन धरणाची एकूण लांबी ९९५ मीटर असून, महत्तम उंची ५५.२७ मीटर आहे. प्रकल्पाची जलसाठवण क्षमता ३८.६० दलघमी असून, एकूण सिंचन क्षमता ६३८० हेक्टर आहे. धरणात २०१०-११ पासून पाणी अडविले जात आहे. मागील आठ वर्षांपासून धरणात पाणी आहे. पण, जून २०१८ पर्यंतदेखील प्रकल्पावर एक एकराचेही सिंचन झालेले नाही. सिंचनाकरिता आवश्यक वितरिका व लघु कालव्याची कामे मागील आठ वर्षांपासून प्रलंबित आहेत.४६० कोटींच्या या प्रकल्पावर सुरक्षिततेच्या अनुषंगाने प्रकल्पस्थळी २४ तास तीन पाळीत सुरक्षारक्षक आवश्यक ठरतात. धरण सुरक्षेकरिता अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक आहे. याकरिता प्राथमिक खर्चाचा अंदाज घेऊन स्वतंत्र अंदाजपत्रक बनविण्याची गरज आहे. तथापि, धरणाच्या सुरक्षिततेकरिता प्रकल्पस्थळी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा कार्यरत नाही.पाटबंधारे विभागाकडे कर्मचारी नाहीत, असे यावर सांगितले जात आहे. केवळ एका मजुराच्या, चौकीदाराच्या भरवशावर हे ४६० कोटींचे धरण सोडण्यात आले आहे.५० एचपीचे जनरेटरपावसाळ्यापूर्वी धरणाचे दरवाजे, दरवाज्यांना तेलपाणी आणि दरवाजे उघडतात की नाही, बंद होतात की नाही, याची तपासणी यांत्रिकी विभागाचे अभियंते, अधिकारी प्रकल्पस्थळी जाऊन स्वतंत्ररीत्या करतात. ५० एचपीचे ते जनरेटर असून वीज नसताना धरणाचे चारही दरवाजे या जनरेटरवर आॅपरेट होतात. हे जनरेटर अंडर रिपेअर असून, चार-पाच वर्षांपासून त्याचे मेंटेनन्स नाही.प्रकल्प अधिकाऱ्यांचे निर्देशसपन प्रकल्पावरही यांत्रिकी विभागाने नुकतीच दरवाज्यांची तपासणी केली. यात पर्यायी व्यवस्थेसाठी जनरेटर बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांची दुरुस्ती, ते सुरू करण्याच्या सूचना त्यांनी प्रकल्प अधिकाºयांना दिल्या आहेत.

टॅग्स :Damधरण