शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘उघडली मंदिराची दारे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी पवनीत कौर व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी पहाटे अंबादेवी मंदिरात दर्शन घेऊन सुरक्षाविषयक बाबींची पाहणी केली.  प्रथेनुसार भक्त आधी अंबादेवीचे दर्शन घेतात व नंतर एकवीरा देवीचे दर्शन घेतात. त्यानुसारच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून गर्दी टाळली जाईल. कोरोना नियमांचे पालन करून सॅनिटायझर व थर्मल स्क्रीनिंग करूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. देवीच्या ओटीची व्यवस्था प्रवेशद्वारावर करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनामुळे बंद असलेली मंदिराची दारे गुरुवारी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर उघडली. या अनुषंगाने अमरावती शहरात भक्त गुरुवारी पहाटेपासूनच श्री अंबादेवी व श्री एकवीरादेवी मंदिराच्या महाद्वारासमोर उत्साहात दार उघडण्याच्या प्रतीक्षेत होते. जिल्हाभरातील देवी-देवतांची दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे पुन्हा गजबजली. भाविकांनी याबाबत आनंद व्यक्त केला. जिल्हाधिकारी पवनीत कौर व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी पहाटे अंबादेवी मंदिरात दर्शन घेऊन सुरक्षाविषयक बाबींची पाहणी केली.  प्रथेनुसार भक्त आधी अंबादेवीचे दर्शन घेतात व नंतर एकवीरा देवीचे दर्शन घेतात. त्यानुसारच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून गर्दी टाळली जाईल. कोरोना नियमांचे पालन करून सॅनिटायझर व थर्मल स्क्रीनिंग करूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. देवीच्या ओटीची व्यवस्था प्रवेशद्वारावर करण्यात आली आहे. अंबादेवी मंदिरात पहाटे ५ वाजता रवींद्र कर्वे व त्यांची पत्नी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. या पूजेसाठी योगेश जोशी, विनोद जोशी, राजू जोशी, मिलिंद देवघरे उपस्थित होते. एकवीरादेवी मंदिरातील घटस्थापना राजेद्र डंबे व पत्नी यांच्या हस्ते पार पडली. यावेळी पूजेसाठी श्रीपाद जोशी, नरहरी पुरानिक, श्रीहरी पांडे, दीपक पाठक उपस्थित होते.

अंबादेवी मंदिर सकाळी ६ ते रात्री ८.३० या वेळेत खुले राहणार आहे. दुपारी १२ ते १२:३० या वेळेत मंदिर सॅनिटाईझ करण्यासाठी बंद राहील. यावेळी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. - विलास मराठे विश्वस्त, अंबादेवी मंदिर ट्रस्ट.

मंदिर उघडण्यापूर्वी भाविकांची रांग होती. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये. म्हणून महिला व पुरुषांची स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली. मंदिर पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहे.- चंद्रशेखर कुलकर्णी कोषाध्यक्ष, एकवीरादेवी मंदिर

नवरात्रोत्सवात यात्रा नसली तरी येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. या परिसरात पोलिसांच्या दोन चौकी आहेत.- डॉ. आरती सिंह पोलीस आयुक्त

 

टॅग्स :Templeमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या