शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

बच्चू कडूंचा अंत पाहू नका, अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल : मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:58 IST

Amravati : मनोज जरांगे पाटलांचा घणाघात; अन्नत्याग आंदोलनाला सक्रिय पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : मी येथे नुसते भाषण ठोकून पाठिंबा जाहीर करायला आलो नाही. महाराष्ट्रातील समस्त शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बच्चू कडूंची संमती घ्यावी. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये एक चाकही फिरणार नाही. शासनाला असा इशारा देऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सक्रिय पाठिंबा दर्शविला.

अन्नत्याग उपोषणाच्या चौथ्या दिवशी बुधवारी मनोज जरांगे पाटील हे उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारला 'लबाडांचे सरकार' संबोधून कडाडून टीका केली. सरकारने बच्चू कडू यांच्या संयमाचा अंत पाहू नये. कारण शांत बसलेला वाघ हा चवताळलेल्या वाघापेक्षा खतरनाक असतो. त्यामुळे बच्चू कडू यांचा संयम सुटला, तर कधी नव्हे असे या महाराष्ट्राचे रौद्ररूप या देशाला पाहावे लागेल. हे जनआंदोलन असून, येथे कुणीही जातपात आडवी आणू नये. कारण बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी लढतोय, कुण्या जातीसाठी नाही. तेव्हा आंदोलनात सहभागी असणाऱ्यांची शेतकरी ही एकच जात असली पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील दहेगाव पाटोदा या ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव घेऊन बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला, तसेच मेंढपाळ संघटना, मच्छीमार संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक संघटना, भारतीय किसान युनियनसह अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

आसेगावात टॉवरवर चढले आंदोलकअन्नत्याग उपोषणाला समर्थन देण्यासाठी आसेगाव पूर्णा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता बीएसएनएल टॉवरवर चढून 'शोले स्टाइल' आंदोलन केले. चांदूर बाजार बंद पुकारण्यात आला होता. यात चांदूर बाजार शहरातील संपूर्ण प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंदच ठेवण्यात आली.

"देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या तेव्हा जातीयवादी गिधाडांनी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडली; परंतु आता शेतकरी या जातीयवाद्यांचे मनसुबे सफल होऊ देणार नाहीत."- रविकांत तुपकर

"अन्नत्याग उपोषणाने आतड्यांना कसे वेढे पडतात, याची मला पूर्ण कल्पना आहे. चार दिवस अन्नावाचून राहणे सोपे नाही. त्यासाठी खूप धाडस लागते व असे धाडसी निर्णय बच्चू कडूंसारखा योद्धाच घेऊ शकतो."- मनोज जरांगे पाटील

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAmravatiअमरावती