‘रेमडेसिवीर’चा अनावश्यक वापर नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 05:00 AM2021-04-25T05:00:00+5:302021-04-25T05:00:45+5:30

जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून समन्वय ठेवण्यात येत आहे.  अनावश्यक वापर व काळाबाजार होऊ नये, यासाठी भरारी पथकही नेमण्यात आले आहे. सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत ठेवण्यात येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी कोविडसुसंगत जीवन आत्मसात करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्व रुग्णालयांनीही रुग्ण व नागरिकांमध्ये प्रसारण, फलक आदी  माध्यमांतून जनजागृती करावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

Don't use 'remedicivir' unnecessarily | ‘रेमडेसिवीर’चा अनावश्यक वापर नको

‘रेमडेसिवीर’चा अनावश्यक वापर नको

Next
ठळक मुद्देखासगी कोविड रुग्णालय संचालकांच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती  : खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा अनावश्यक वापर होता कामा नये. रेमडिसिविरच्या उपलब्धता व नियंत्रणासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, गरज नसेल तिथे अवाजवी वापर होणे चुकीचे आहे. याबाबत शासनाने वेळोवेळी प्रसृत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व रुग्णालयांकडून पालन व्हावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी दिले.
जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, आ. सुलभा  खोडके,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते.
जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून समन्वय ठेवण्यात येत आहे.  अनावश्यक वापर व काळाबाजार होऊ नये, यासाठी भरारी पथकही नेमण्यात आले आहे. सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत ठेवण्यात येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी कोविडसुसंगत जीवन आत्मसात करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्व रुग्णालयांनीही रुग्ण व नागरिकांमध्ये प्रसारण, फलक आदी  माध्यमांतून जनजागृती करावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
 
डॉक्टरांनी करावे समुपदेशन
कोरोना उपचारात रेमडेसिवीर हाच एकमेव रामबाण उपाय समजून खासगी डॉक्टर त्याचा अवाजवी वापर करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ते तत्काळ थांबावे. गरज नसलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडूनही रेमडेसिविरबाबत मागणी होत असेल, तर डॉक्टरांकडून त्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. सर्व रुग्णालयांना गरजेनुसार इंजेक्शन, ऑक्सिजन आदी बाबी उपलब्ध करून दिल्या जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

औषधांचा अवाजवी वापर थांबवा
 रेमडेसिविर, ऑक्सिजन, लस आदी सर्व बाबींची कमतरता भासू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, कोरोना संसर्गाच्या या काळात आवश्यक तिथेच औषधांचा वापर, अवाजवी वापर टाळणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व रुग्णालयांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

Web Title: Don't use 'remedicivir' unnecessarily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.