शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

पळसखेड येथे भरला गाढवांचा पोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर रेल्वे : वर्षभर बळीराजा त्यांच्या सर्जा-राजाकडून शेतीच्या मशागतीची कामे करून घेतो. त्याचप्रमाणे पळसखेड येथे गाढवांकडून ...

ठळक मुद्देभूतदया । मुक्या प्राण्यांविषयीची कृतज्ञता

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : वर्षभर बळीराजा त्यांच्या सर्जा-राजाकडून शेतीच्या मशागतीची कामे करून घेतो. त्याचप्रमाणे पळसखेड येथे गाढवांकडून भोई समाजासह अन्य काही समाजातील घटक कामे करून घेतात. गाढव हा प्राणी त्यांच्या उपजीविकेचे साधनच आहे. पोळ्याच्या दिवशी ज्याप्रकारे बैलांना स्नान घालतात, झुल चढवितात, अगदी त्याच प्रमाणे पळसखेड येथे शुक्रवारी गाढवांनादेखील स्नान घालण्यात आले, झुल चढवली तसेच पुरणपोळीदेखील खाऊ घातली.गाढवांना पोळ्याच्या तोरणा खाली उभे करून पूजन करण्यात आले. ज्याप्रमाणे शेतकरी बैलांचा पोळ्यानिमित्त साजश्रुंगार करतात, त्याचप्रमाणे येथील भोई समाजबांधवांनी गाढवांना सजवून व त्यांचा पोळा भरवून सण साजरा केला. पळसखेडमध्ये मागील २३ वर्षांपासून हा गाढव पोळा साजरा होत आहे. यंदाच्या सोहळ्यात ३०-३५ गाढव सहभागी करण्यात आली होती.

गाढव ऐटीतभोई, कुंभार, वडार, बेलदार हे समाज वर्षानुवर्षे गाढव पाळत आले आहेत. यातील भोई समाज गाढवांबद्दलची आपली कृतज्ञता बैलपोळ्याप्रमाणेच गाढवांचा पोळा साजरा करून व्यक्त करत असतो. ज्या गाढवाची इतर सगळा समाज हेटाळणी करीत असतो, जे गाढव आपल्या भेसूर ओरडण्यासाठी परिचित आहे, जे गाढव कुरूपतेसाठी ओळखले जाते, तेच कष्टकरी गाढव पोळ्यात विविध वेलीफुलांच्या, नक्षींच्या रंगबेरंगी झुली पांघरलेले, विविध रंगांच्या रंगांनी रंगविले होते. यावेळी त्यांची वेगळीच ऐट भासत होती.

टॅग्स :Socialसामाजिक