शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सावळापुरात पिसाळलेल्या श्वानाचा धुमाकूळ, दोघांचा मृत्यू, तिघांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 12:53 IST

गावात भटकणाऱ्या श्वानांपैकी एका पिसाळलेल्या श्वानाने गावातील सात लोकांना चावा घेतला. श्वान चावल्यानंतर काही दिवसांनी दोघांची प्रकृती चिंताजनक बनली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांवर औषधोपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : अचलपूर तालुक्यातील सावळापूर गावात पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्यामुळे उपचारादरम्यान गावातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघांवर औषधोपचार सुरू आहेत.

दिवाळीच्या आधी, आठीच्या दरम्यान गावात भटकणाऱ्या श्वानांपैकी एका पिसाळलेल्या श्वानाने गावातील सात लोकांना चावा घेतला. श्वान चावल्यानंतर काही दिवसांनी दोघांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यांना उपचारार्थ अमरावती येथील रुग्णालयात दाखल केल्या गेले. दरम्यान प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना नागपूरला हलविण्यात आले.

नागपूर येथे उपचारादरम्यान गुरुवार, १८ नोव्हेंबरला आराध्या भटकर नामक सात वर्षीय मुलीची तर शुक्रवार, १९ नोव्हेंबरला ५५ वर्षीय श्रीकृष्ण राऊत यांची प्राणज्योत मालवली. या दोन्ही मृतकांच्या पार्थिवावर गावातच अंतिम संस्कार केल्या गेलेत.

दरम्यान त्या पिसाळलेल्या श्वानाला ठार करण्यात आले असून अन्य जखमी लोक गावातच उपचार घेत आहेत. या घटनेमुळे गावात भीतीयुक्त वातावरण असून भटक्या श्वानांची चांगलीच दहशत पसरली आहे

टॅग्स :Deathमृत्यूdogकुत्रा