शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

नव्या आमदारांना ‘दिवाळी स्पेशल फटाके’

By admin | Updated: October 25, 2014 22:32 IST

विधानसभा निवडणूक नुकतीच आटोपली. अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या निवडणुकीचे ‘लालित्य’ अद्यापही संपलेले नाहीत. सोशल मीडियावरही निवडणूक प्रचंड गाजली. नवे आमदार जाहीर झाले

अमरावती : विधानसभा निवडणूक नुकतीच आटोपली. अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या निवडणुकीचे ‘लालित्य’ अद्यापही संपलेले नाहीत. सोशल मीडियावरही निवडणूक प्रचंड गाजली. नवे आमदार जाहीर झाले आणि लगोलग दिवाळी आली. लागलीच ‘व्हॉट्स अप’वर या दिवाळी आणि आमदारांची सांगड घातली जाऊ लागली. अमरावती जिल्ह्यातील नवीन आमदारांच्या नावे ‘दिवाळी स्पेशल फटाके’ या मथळ्याखाली भन्नाट शुभेच्छा संदेशांचे ‘सर्फिंग’ सुरू आहे. हे ‘दिवाळी स्पेशल फटाके’ लावताना ‘कृपया मनावर घेऊ नये..’ असा सावध पवित्राही घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील आठही नवनिर्वाचित आमदारांच्या एकूण कारकिर्दीला आणि मारलेल्या मैदानाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ‘शायरी’च्या स्वरूपात हे अर्थपूर्ण संदेश तयार करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील सर्वात रोचक ठरलेल्या देशमुख-शेखावतांच्या लढतीमध्ये रावसाहेबांना पराभूत करून मताधिक्याने निवडून आलेल्या सुनील देशमुखांसाठी ‘पांच साल पहले जो आॅपरेशन तू छोड गयाआज उसे पुरा करने का मौका फिरसे आ गया’ ही अर्थपूर्ण शायरी तयार झालीय.निवडणुकीदरम्यान किराणा वाटण्याच्या मुद्यावरून चर्चेत राहिलेल्या रवी राणांसाठी,‘अब गरीब को काम दे, किराना नहीक्योंकी तू खुद युवा है, पुराना नही’हे थेट शरसंधान साधण्यात आले आहे. भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या अरूण अडसड यांचा अटीतटीच्या निवडणुकीत पराभव करून ‘सिंकदर’ठरलेल्या वीरेंद्र जगताप यांच्यासाठी तयार करण्यात आलेला शेरही बराच रोचक आहे,‘इतना भी गुमान न कर अपनी जीत पर ऐ बेखबरशहर में तेरी जित से ज्यादा चर्चे तो मेरी हार के है’जय-पराजयाचे अन्वयार्थ काढण्यात सोशल मीडियाही मागे नाही, हेच यावरून स्पष्ट होते. अचलपूर मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक साधणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर तर स्तुती सुमनांचा वर्षावच झालाय,‘राजनीति की कौनसी किताब पढते हो भाई,तिसमारखानों की करते हो हर बार धुलाई’या शायरीतूून कडूंना त्यांच्या विजयाचे गुपितच विचारण्यात आले आहे.जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले अनिल बोंडे यांच्यासाठी,‘इंजेक्शन लगाते है अमरावती मेंमरीज झुम उठता है मोर्शी में’अशी रचना करून त्यांच्या कार्यपध्दतीवर शेरेबाजी करण्यात आली आहे. खासदारपुत्र अभिजित अडसूळ यांचा पराभव करून विजय नोंदविणाऱ्या नवख्या रमेश बुंदिलेंच्या नावाचा सुरेख वापर करून रचलेल्या चार ओळी रचणाऱ्याच्या कल्पकतेची दाद द्यायला लावतात,‘कप्तान के हवाई जहाज केकर दिए पुर्जे ढिलेलोग बांटे मिठाईऔर साहब कहे‘ले बुंदी ले..महिला असूनही कडवी झुंज देऊन विजयावर शिक्कामोर्तब करून स्वत:ची आणि पक्षाची प्रतिमा उंचावणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्यासाठी,‘एक नारी सब पे भारीअसमंजस में रहे दुनिया सारी’ या शायरीतून त्यांना सॅल्युटच ठोकलेला दिसतो. मेळघाट मतदारसंघातून निवडून आलेले प्रभुदास भिलावेकर यांच्यासाठी,‘शिवराज की रॅली झकासप्रभू के दास हो गये पास’या ओळींची रचना करून त्यांच्या विजयाची कारणमीमांसा अगदी स्पष्ट आणि परखडपणे केल्याचे दिसते. व्हॉट्स अ‍ॅपवरील एका ग्रुपमध्ये सध्या या संदेशांचे वेगात आदानप्रदान सुरू आहे. (प्रतिनिधी)