शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अमरावतीत पाच लाखांच्या लाचप्रकरणी विभागीय वनअधिकाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 17:05 IST

पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सामाजिक वनीकरणच्या विभागीय वनाधिकाऱ्याला विभागाने बुधवारी अटक केली. राजेंद्र गणेश बोंडे (५७, रा. मोर्शी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या उपवनसंरक्षकाचे नाव आहे.

ठळक मुद्देसामाजिक वनीकरण विभागात डीएफओ म्हणून कार्यरतलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सामाजिक वनीकरणच्या विभागीय वनाधिकाऱ्याला विभागाने बुधवारी अटक केली. राजेंद्र गणेश बोंडे (५७, रा. मोर्शी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या उपवनसंरक्षकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, वरूड येथील सामाजिक वनीकरण विभागात वनक्षेत्र अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार दिल्याप्रकरणी मोबदला म्हणून उपवनसंरक्षक राजेंद्र बोंडे याने तक्रारदाराला १६ जुलै २०२० रोजी पाच लाखांची मागणी केली होती. तक्रारदाराने या प्रकाराची तक्रार अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. उपवनसंरक्षक बोंडेला पाच लाखांपैकी अडीच लाख रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे निश्चित झाले.

१० सप्टेंबर रोजी स्थानिक कांतानगर येथील व्हीनस पार्क या त्यांच्या निवासस्थानी ही रक्कम देण्यात आली. सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचेच्या रकमेसह उपवनसंरक्षक बोंडेला ताब्यात घेण्यात आले. गाडगेनगर पोलीस ठाण्यात डीएफओ बोंडेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक गजानन पडघन, जमादार चंद्रशेखर दहीकर, पोलीस शिपाई सुनील वराडे, अभय वाघ, वाहनचालक चंद्रकांत जनबंधू यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी