शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा महिला काँग्रेस राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 23:04 IST

देशासह राज्यात सदस्य नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट शक्ती’ अभियानात अमरावती जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने सर्वाधिक महिला सदस्यांची नोंदणी करीत राज्यात अग्रक्रम मिळविला. व्दितीय पुणे ग्रामीण, तर तृतीय क्रमांक पुणे शहराला मिळाला.

ठळक मुद्देप्रोजेक्ट शक्ती : महिलांचे मनोधैर्य वाढविण्यावर भर, सर्वाधिक सदस्य नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशासह राज्यात सदस्य नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट शक्ती’ अभियानात अमरावती जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने सर्वाधिक महिला सदस्यांची नोंदणी करीत राज्यात अग्रक्रम मिळविला. व्दितीय पुणे ग्रामीण, तर तृतीय क्रमांक पुणे शहराला मिळाला. जिल्हाध्यक्षा छाया दंडाळे यांच्या नेतृत्वात महिलांचे सुसंवादासह सक्षमीकरण व मनोधैर्य वाढविण्यावर भर दिल्याने जिल्हा महिला काँग्रेस कमेटीचा गौरव करण्यात आला.अखिल भारतीय महिला काँग्रेस व प्रदेश महिला काँग्रस कमेटीच्या आदेशानुसार महिला सदस्यांच्या नोंदणीसाठी ‘प्रोजेक्ट शक्ती’ अभियान राज्यासह देशात राबविण्यात आले. महिला काँंग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा चारुशीला राव टोकस यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्षा छाया दंडाळे यांच्या नेतृत्वात जिल्हा महिला काँग्रस कमेटीने राज्यात सर्वाधिक नोंदणी केली. वर्धा येथे दोन आॅक्टोबर रोजी झालेल्या अखिल भारतीय महिला काँग्रसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय सचिव सोनल पटेल, आशिष दुवा, तसेच प्रोजेक्ट शक्तीच्या प्रमुख आकांक्षा हिरा, प्रदेश सरचिटणीस संध्या सव्वालाखे, माजी प्रदेशध्यक्षा कमल व्यवहारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारूशिला राव टोकस यांनी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या अद्यक्षा छाया दंडाळे व कार्यकारीणीचा गौरव केला.जनसंवाद अभियानातही जिल्हा महिला काँगे्रस प्रथममहाराष्ट्र प्रदेश महिला काँगे्रस कमिटीद्वारा १ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘जनसंवाद अभियान राबविण्यात आले. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचून सुसंवाद साधणे, त्यांच्या समस्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा उद्देश होता. यामध्ये जिल्हा महिला काँगे्रस कमिटीने प्रथम स्थान मिळविले. अभियानासाठी प्रदेश सरचिटणीस ऊषा उताणे, माजी आमदार केवलराम काळे, भारती गावंडे, जयश्री चव्हाण, वनिता पाल, सुषमा कोकाटे, विजया सोमवंशी यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.