शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा खाजेने बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:33 IST

जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी कहर केला असताना गजकर्णानेही तोंड वर काढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दीड वर्षांत अंगावर 'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच गजकर्णाच्या रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या शंभर रुग्णांमध्ये २० रुग्ण खाजेचे असल्याचे चित्र आहे. दूषित पाण्यापासून साथीच्या आजारांसह त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा संसर्ग इतरांना जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देरुग्णांमध्ये चौपट वाढ : शंभरामागे २० रुग्ण

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी कहर केला असताना गजकर्णानेही तोंड वर काढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दीड वर्षांत अंगावर 'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच गजकर्णाच्या रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या शंभर रुग्णांमध्ये २० रुग्ण खाजेचे असल्याचे चित्र आहे. दूषित पाण्यापासून साथीच्या आजारांसह त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा संसर्ग इतरांना जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्याच्या दिवसांत कपडे पूर्णपणे वाळत नसल्याने तेच परिधान केल्यास त्वचेवर लाल चट्टे पडतात. त्याला ‘रॅशेस’ असेही म्हणतात. वातावरणात बदल होत असल्याने पाणी व घामामुळे त्वचारोगात वाढ होत आहे. पूर्वी हा आजार कुटुंबातील एखाद्यालाच व्हायचा आणि त्यावर योग्य उपचार घेतल्यानंतर लगेच बराही व्हायचा. पण, आता एकानंतर दुसऱ्याला, दुसऱ्यानंतर तिसऱ्याला अशाप्रकारे एकाच कुटुंबातील सर्वांना याची पाठोपाठ लागण होत आहे. म्हणून हे इंन्फेक्शन पूर्णपणे बरे होईपर्यंत त्याच्यावर उपचार घेण्याचा तसेच उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा सल्ला त्वचारोगतज्ज्ञांनी दिला आहे.अशी करा उपाययोजनागजकर्ण झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवा. एकच फणी आणि एकमेकांचे कपडे वापरू नका. रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा. बाह्य उपचारांबरोबरच पोटसुद्धा साफ असणे आवश्यक. त्वचा नेहमी कोरडी राहील, याची काळजी घ्या. वजन जास्त असल्यास मांडीला मांडी घासते व घामाने आजार वाढतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ शरीरावर पावडर लावा. ओले कपडे परिधान करणे टाळा.विषाणू जाईपर्यंत आजार कायमपूर्वी हा आजार बरा व्हायला जवळपास दोन आठवडे लागायचे. पण, आता औषध, मलम लावूनही लगेच बरा होत नाही. त्याचे डाग जायलाही जवळपास तितकेच महिने जातात. गजकर्ण बरा झाला, की पुन्हा येत नव्हता. पण, आता या आजाराचा विषाणू जोपर्यंत त्वचेतून पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत अधूनमधून हा आजार उद्भवत राहतो.शरीराच्या या भागावर होतो आजारहात, मान, चेहरा, कोपर, पोटावरील त्वचेवर, बोटांच्या बेचक्यात, पोटावर, काखेत तसेच जननेंद्रियांच्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्वचेची आग होणे, खाज येणे, कपडे घट्ट घातलेल्या ठिकाणी खाज व चट्टे निर्माण होतात.काही वर्षांपूर्वी १०० रुग्णांपैकी पाच ते सहा रुग्ण 'फंगस इन्फेक्शन'चे असायचे. पण, आता दररोज २० ते २५ रुग्ण 'फंगस इन्फेक्शन'वर उपचार घेण्यासाठी येत आहेत.- डॉ. गणेश मुधडा,त्वचारोगतज्ज्ञ अमरावती