शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

कुटुंब नियोजनात जिल्हा माघारला; तीन महिन्यात तीनच शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 11:43 IST

Amravati : कुटुंब नियोजन जनजागृतीसाठी आरोग्य विभागाला अपयश

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : वाढती लोकसंख्या ही देशातील सर्वांत मोठी समस्या आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कुटुंब नियोजनाविषयीची जनजागृती केली जाते; परंतु जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला त्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात तीन महिन्यांमध्ये फक्त तीन पुरुषांच्याच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या. सबब, वर्षभरातील एकूण पुरुष शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टापैकी तीन महिन्यात केवळ ०.२८ टक्केच उद्दिष्ट आरोग्य विभागाला गाठता आले आहे. तर महिलांच्या देखील केवळ ६७० शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या असून ५.६२ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. 

११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन झाला. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख ८७ हजार ८२६ इतकी होती. गेल्या १३ वर्षांमध्ये ती लोकसंख्या ३२ लाखांपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य, शिक्षण, निवारा यांसारख्या समस्याही निर्माण होत आहेत. त्यामुळे कुटुंब नियोजन ही काळाची आहे. त्यामुळे वर्षभरात स्त्री आणि पुरुषांच्या मिळून एकूण १२ हजार ९९७ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांत केवळ ५.१८ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

ग्रामीण भागात एकही शस्त्रक्रिया नाहीएप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. ग्रामीण भागात ८८५ पुरुष शस्त्रक्रिया तर ९ हजार ७२० महिला असे एकूण १० हजार ६०५ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे.

शहरात ६७३ शस्त्रक्रियातीन महिन्यांमध्ये झालेल्या ६७३ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया या शहरी भागातील आहेत. शहरात पुरुष शस्त्रक्रियेचे १९६ इतके उद्दिष्ट असून त्यातील ३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर २१९६ महिलांचे उद्दिष्ट असून ६७० महिलांच्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यात.

पुरुष नसबंदीविषयी अनेक गैरसमजनसबंदी शस्त्रक्रिया केली तर आपले पुरुषत्व जाईल, अशी भीती पुरुषांना वाटते. शस्त्रक्रियेमुळे तो अशक्त होईल, असा गैरसमज पुरुषांमध्ये असल्याने या शस्त्रक्रियेसाठी आजही पुरुषांची संख्या कमी आहे. 

टॅग्स :FamilyपरिवारAmravatiअमरावती