शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

मुद्रांक विक्रीचा जिल्ह्यात गोंधळ

By admin | Updated: December 9, 2014 22:43 IST

शासकीय, निमशासकीय कामकाजासाठी सर्वाधिक मागणी असणाऱ्या १०० रूपयांच्या मुद्रांक विक्रीसाठी अनेक किचकट नियम लावल्याने मुद्रांक विक्रेत्याद्वारा बऱ्याचदा मुद्रांक देण्यास टाळाटाळ केली जाते.

अमरावती : शासकीय, निमशासकीय कामकाजासाठी सर्वाधिक मागणी असणाऱ्या १०० रूपयांच्या मुद्रांक विक्रीसाठी अनेक किचकट नियम लावल्याने मुद्रांक विक्रेत्याद्वारा बऱ्याचदा मुद्रांक देण्यास टाळाटाळ केली जाते. याचा फटका ग्राहकांना बसत आहे, मुद्रांकाचा तुटवडा निर्माण होत आहे.हक्कसोडपत्र, खरीदीपत्र, हरविले, सापडले यासह विविध दाखले घेण्यासाठी १०० रूपयांच्या मुद्रांकाची सर्वाधिक मागणी असते. मुद्रांकांच्या एकूण विक्रीमध्ये ५० टक्के मुद्रांक हे १०० रूपयांचे आहेत. या शंभर रूपयांच्या मुद्रांकासाठी राज्य शासनाद्वारा अनेक किचकट नियम केले आहे. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांची गोची झाली आहे. केवळ तीन रूपयांच्या कमीशनवर कागदोपत्री नोंदीची कामे मोठ्या प्रमाणात वाढल्याने विक्रेत्यांनी या मुद्रांकाची विक्रीसाठी टाळाटाळाची धोरण अवलंबिले आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. शंभर रुपयांचा मुद्रांक खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शंभर रूपयांचा मुद्रांक विकताना विक्रेत्याला दहा ते बारा कॉलमची माहिती भरावी लागते. मुद्रांक कोण घेणार? कोणासाठी घेणार? कामाचे स्वरुप काय?, पत्ता, तारीख, खरेदीदाराला पावती देणे, त्याची सही घेणे, कर्ज काढण्यासाठी मुद्रांक घेत असल्यास कर्ज किती रूपयांचे? बँक कोणती? जामीनदार कोण? आदी माहिती नियमाने मुद्रांक विक्रेत्यांना भरावी लागते. या कामासाठी या विक्रेत्याला ३ रूपये कमीशन मिळतात. त्यामुळे विक्रेत्यांद्वारा टाळाटाळ केली जाते. (प्रतिनिधी)