अपंग, अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप

By admin | Published: August 29, 2015 12:30 AM2015-08-29T00:30:09+5:302015-08-29T00:30:09+5:30

सुपर संगणकाची निर्मिती करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधणाऱ्या पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या कार्यगौरव महोत्सवाचे आयोजन ...

Distribution of school literature to children with disabilities, orphaned children | अपंग, अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप

अपंग, अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप

Next

विजय भटकर : एक दिवसीय टेक्निकल इव्हेंट
अमरावती : सुपर संगणकाची निर्मिती करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधणाऱ्या पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या कार्यगौरव महोत्सवाचे आयोजन मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा या त्यांच्या जन्मगावी ११ आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे.
डॉ. विजय भटकर यांच्या जन्मदिनी एक दिवसीय टेक्निकल इव्हेंट घेण्याची कल्पना दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाने जाहीर केली असून 'इन्नोव्हेटिव टेक्नॉलॉजी फॉर रुरल डेव्हलपमेंट इन विदर्भ' या शीर्षकाखाली पोस्टर प्रेझेंटेशन व वर्किंग मॉडेल एक्सप्लेनेशन यासाठी अभियांत्रिकी, तांत्रिकी, संगणक विभाग व कृषी विभागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भाग घेता येईल. या प्रक्रियेसाठी गाडगेबाबा मंडळाद्वारे अमरावती विभागातील सर्व शासकीय अभियांत्रिती महाविद्यालयांच्या प्राचार्यांची सभा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डब्ल्यू. झेड. गंधारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या संकल्पनेला जवाहरलाल दर्डा इंस्टिट्युट आॅफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, दारापूरचे प्राचार्य अनिवाश कोल्हटकर, दारापूरचे प्राचार्य संजय खेरडे, विक्रमशिला पॉलिटेक्निकचे प्राचार्य दीपक शिरभाते, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य गजानन पुंडकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन गजानन भारसाकळे यांनी, तर आभार प्रदर्शन तृप्ती घोंगडे यांनी केले.

Web Title: Distribution of school literature to children with disabilities, orphaned children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.