बडनेरा : स्थानिक जैन स्थानक येथे महावीर जयंतीनिमित्त अखंड जप साधना तसेच गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले. विविध ऑनलाईन स्पर्धा देखील घेण्यात आल्या. कोविड संसर्गाचे सर्व नियम पाळून उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
शहरातील जैन स्थानक याठिकाणी महावीर जयंतीनिमित्त सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत अखंड नवकार महामंत्राचा जप करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. अनेक गोरगरीब अडचणीत आहेत. अशा गरजूंना मदत मिळावी, यासाठी जैन बांधवांकडून निधी संकलित करण्यात आला. त्या पैशातून किराणा किटचे वाटप करण्यात आले. गत वर्षीदेखील असाच उपक्रम राबविण्यात आला होता. सर्व कार्यक्रम कोरोना संसर्ग लक्षात घेता कमी गर्दीत पार पडलेत. दोन वर्षांपासून साधेपणाने महावीर जयंती साजरी होत आहे. येथे भव्य शोभायात्रा काढली जात होती. सर्व धर्मीयांचे लोक त्यात सहभाग घेत होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे महावीर जयंती उत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. ओसवाल जैन समाजाच्यावतीने ऑनलाइन विविध स्पर्धादेखील घेण्यात आल्या. या संपूर्ण उपक्रमासाठी नरेंद्र गांधी, प्रदीप जैन, जवाहर गांग, राजेंद्र देवडा, संजय गोसलिया, धर्मेंद्र कामदार, महावीर देवडा, कवरीलाल ओस्तवाल, मनोज गांग, योगेश रुणवाल, संजय कटारिया, जयेश दर्डा, नितीन कटारिया, कांता छाजेड, प्राची जैन, सीमा गांग, सपना रुणवाल, पल्लवी मेहता, किरण संकलेचा, सोनल गांग, दिप्तीबेन गांधी, आनंदी कटारिया यासह इतरही जैन बांधवांनी सहभाग घेतला होता.