खऱ्या अर्थाने राजकारणाचे सत्ताकेंद्र म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. चांदूर बाजार तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यावर आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी म्हणून शिवसेना, प्रहार काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तालुक्यात बच्चू कडू यांची प्रहार संघटना व कॉंग्रेसचे बबलू देशमुख यांच्या गटामध्ये नेहमीच राजकीय संघर्ष मागच्या अनेक वर्षांपासून पाहावयास मिळतो. आसेगाव पूर्णा हे मोठे गाव स्वत:कडे ठेवण्यासाठी प्रहार, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांकडून जोरदार प्रयत्न होत आहेत. राजकीय पक्ष मोर्चेबांधणीसाठी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून सरपंचपदाचे आरक्षण व त्यासाठी आवश्यक असलेल्या आपल्या गटातील माणूस कोण, याचा शोध घेत आहेत.
====<<>>====
सरपंचाची संधी हुकली?
भाजपच्या सत्ताकाळात थेट सरपंचपदाची निवडणूक घेण्याचा कायदा संमत झाला. परंतु, आघाडी सरकारने अशी निवडणूक रद्द केल्याने आता निवडलेल्या सदस्यांमधून सरपंच होणार आहे. त्यामुळे घोडेबाजाराची शक्यता व्यक्त होत असून, संधी हुकल्याबाबत तरुणाईत नाराजीचा सूर आहे.