Disposal of waste in Zadepi | झडेपीतील कचऱ्याची विल्हेवाट

झडेपीतील कचऱ्याची विल्हेवाट

अमरावती : जिल्हा परिषदेच्या आवारात पसरलेला केरकचरा पडून होता. अखेर प्रशासनाने याची दखल घेत अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिल्यामुळे ही साफसफाई गुरुवारी करण्यात आली.

..........................................

सीईओच्या दालनात खातेप्रमुखांची बैठक

अमरावती : जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ तुकाराम टेकाळे यांच्या दालनात गुरुवारी खातेप्रमुखांची बैठक पार पडली. यात प्रजाकसत्ताक दिन व अन्य कामकाजाबाबत चर्चा झाली. यावेळी कॅफो चंद्रशेखर खंडारे, डेप्युटी सीईओ दिलीप मानकर, शिक्षणाधिकारी ई.झेड. खान, सहायक कॅफो दत्तात्रय फिसके उपस्थित होते.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

आचारसंहिता आटाेपताच कामाला वेग

अमरावती : आचासंहितेमुळ रखडून पडलेल्या प्रशासकीय कामकाजाला वेग आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर आचारसंहितेमुळे विकासात्मक कामे थांबली होती. आता मात्र या कामांना गती आलेली आहे.

,,,,,,,,,,,,,,,,,,,

येवता ते दोनोडा रस्ता उखडला

अचलपूर ; तालुक्यातील येवता ते दोनोडा हा डांबरी रस्ता उखडून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

...................................

तूर संवगणीला वेग

अमरावती : ग्रामीण भागात सध्या काही ठिकाणी तुर सवंगणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग या कामात व्यस्त असून येत्या महिनाभरात या कामाला अधिक वेग येणार आहे.

Web Title: Disposal of waste in Zadepi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.