शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यात फेकलेल्या बालिकेची अमरावतीला रवानगी

By admin | Updated: May 7, 2016 00:45 IST

दि. ३० एप्रिललच्या रात्री ११.२५ वाजता शहरातील शांकुतल कॉलनीत अभागी मात्या-पित्याने नवजात बालिकेला कचऱ्यात फेकल्याची घटना उघडकीस आली.

माता-पित्याचा शोध नाही : दत्तक घेण्यासाठी अनेकांची तयारीवरूड : दि. ३० एप्रिललच्या रात्री ११.२५ वाजता शहरातील शांकुतल कॉलनीत अभागी मात्या-पित्याने नवजात बालिकेला कचऱ्यात फेकल्याची घटना उघडकीस आली. अखेर त्या बेवारस नवजात बालिकेची अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे. मुलगी घरात जन्म घेताच लक्ष्मीचे रुप समजले जाते. तरीही केवळ मुलाचा अट्टाहास करुन मुलीला गर्भातच मारण्याचा प्रकार शहरासह खेडयापाडयात सुरू असतो, तर वंशाच्या दिव्याकरिता प्रयत्नशील असणारी जोडपी आणि कुटुंबे अनेक आहेत. पंरतु मुलीच वंशाचा दिवा असल्याचे सिध्द होऊनही मुलीवर प्रेम करणारे फार थोडे आहेत. असाच प्रकार शहरातील शांकूतल विहारात ३० एप्रिलच्या रात्री उघडकीस आला. तीन युवकांना रडण्याचा आवाज ऐकू आल्यावरून शोध घेतला असता एक गोरीगोमटी नवजात बालिका विव्हळत असताना दिसली. तिला बाल रुग्णालयात दाखल करण्यात येऊन पोलिसांना माहिती दिली. परंतु चार दिवसांचा अवधी लोटूनही पोलिसांना ते निर्दयी अभागी माता पिता अद्यापही गवसले नाहीत, हे ेआश्चर्य आहे. बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण चौधरी आणि डॉ.समता चौधरी या दाम्पत्यांनी उपचार करून नवजात शिशूला सावध केले होते. परंतु पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून नवजात बालिकेला अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णलयामधील बालकल्याण मंडळाच्या ताब्यात देण्यात आले. स्त्री भ्रूणहत्येचे भूत अद्यापही समाजातील लोकांच्या डोक्यावर चढले असल्याचे पुन्हा या धटनेने सिध्द होते. केवळ वंशाचा दिवा पाहिजे म्हणून फेकण्यात आलेल्या त्या नवजात बालिकेला अंधाऱ्या रात्री कचऱ्यात फेकण्यात आल्याने हृदयाचा थरकाप उडविणारे वृत्त ऐकून अनेकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या. परंतु त्या युवकांनी धाडसामुळेचे तीच ेप्राण वाचले. पोटच्या गोळयाला कचऱ्यात फेकणारी ती अभागी माता कोण? याचा शोध अद्यापही सुरुच आहे. नवजात गोऱ्यागोमट्या बालिकेला दत्तक घेण्याकरिता तालुक्यातून शेकडो हात पुढे सरसावले आहे. (तालुका प्रतिनिधी)‘त्या’ एक दिवसाच्या बालिकेला बेवारस फेकणाऱ्या माता-पित्याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र अद्यापही धागेदोरे गवसले नाहीत. सदर नवजात बालिका ही मध्य प्रदेशातील असावी, असा अंदाज आहे. परंतु सदर बालिकेच्या पालणपोषणाकरिता तिला जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे बाल कल्याण मंडळाच्या ताब्यात देण्यात आले आहे. किमान सहा महिने तरी तिला दत्तक दिले जाणार नाही. तिच्या जन्मदात्यांचा शोध घेणे अनिवार्य आहे.- अर्जुन ठोसरे, ठाणेदार.