शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद बैठकीत निवडणूक रणनीतीवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

महाराष्ट्रात सध्या घाणेरडे राजकारण सुरू असल्याची टीका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले. या हल्ल्यामागे भाजप असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्याचा उद्योग भाजपने चालविला असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणारे असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावती विभागातील नेते, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी घेण्यात आलेल्या संवाद बैठकीतून  निवडणुकीची रणनीती आखली. विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका अथवा नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अव्वल कशी राहील, याचे विचारमंथन झाले. येत्या काळात अमरावतीत दोन दिवसीय शिबिर आयोजनावरही शिक्कामाेर्तब करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाने जोश भरला, हे विशेष. येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या संवाद बैठकीला व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार प्रकाश गजभिये, आमदार राजू तोडसाम, आमदार अमोल मिटकरी, आमदार किरण सरनाईक, एकनाथ खडसे, गुलाबराव गावंडे, माजी आमदार तुकाराम बिडकर, इंद्रनील नाईक, माजी मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार संदीप बाजोरिया, माजी विधानसभा उपसभापती शरद तसरे, केवलराम काळे, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, रमेश बंग, माजी आमदार रेखा खेडकर, माजी मंत्री भारत बोंद्रे, गुलाबराव गावंडे, बळीराम शिरसकार, हरिदास भदे,    शैलेजा तोटे, सुनील पाटील, दत्ता डहाके, महिला पदाधिकारी सुरेखा ठाकरे, संगीता ठाकरे, सलील देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय समन्वयक संजय खोडके यांनी केले.

राज्य सरकार धोक्यात आणण्यासाठी षडयंत्रराज्याचे महाविकास आघाडीची सत्ता धोक्यात आणण्यासाठी दरदिवशी नवनवी षडयंत्रे रचत असल्याचा आरोप खासदार शरद पवार यांनी आवर्जून केला. सरकार अस्थिर करण्याचे मनसुबे हाणून पाडा.

वैनगंगेचे पाणी नळगंगेद्वारे पश्चिम विदर्भात येणार : जयंत पाटीलवैनगंगेच्या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी हे नळगंगेद्वारे पश्चिम विदर्भात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी म्हणाले. याबाबत पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आम्हाला यापूर्वी सूचित केले आहे. त्यामुळे येथील सिंचनाचा अनुशेष दूर होणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या पोलीस अटकेत असलेल्या अनिल देशमुख व मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा त्यांनी निषेध नोंदविला. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. 

संजय खोडके यांच्यावर कौतुकाची थापराष्ट्रवादी कॉंग्रेसची अमरावती विभागीय संवाद बैठक आयोजित केल्याबद्दल नेते शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदींनी संज़य खोडके यांच्या कार्यावर कौतुकाची थाप दिली. काेरोनानंतर पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांची यशस्वी बैठक झाली, हे विशेष.

राज्यात घाणेरड्या राजकारणाचा शिरकाव : एकनाथ खडसेमहाराष्ट्रात सध्या घाणेरडे राजकारण सुरू असल्याची टीका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले. या हल्ल्यामागे भाजप असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्याचा उद्योग भाजपने चालविला असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणारे असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

एसआरपीएफच्या चार कंपन्यांसह पोलीस बंदोबस्तराष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईस्थित ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला चढवला. त्या अनुषंगाने अमरावतीतील पवार यांच्या जाहीर कार्यक्रमावर पोलिसांची करडी नजर होती. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात डीसीपीद्वय विक्रम साळी व एम. एम. मकानदार, पाचही सहायक पोलीस आयुक्तांची प्रत्येक घडामोडीवर सूक्ष्म नजर होती. एसआरपीएफच्या चार कंपन्यांसह १० पोलीस निरीक्षक, २८ सहायक व उपनिरीक्षक, २१५ पोलीस अंमलदार, ३७ महिला अंमलदार व २० पोलिसांचा समावेश असलेली आरसीपीदेखील तैनात होती. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार