शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

माहिती न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई

By admin | Updated: June 10, 2014 23:48 IST

फक्त प्रथम नियुक्तीच्यावेळी मत्ता व दायित्वे याची विवरण पत्र सादर करण्यात येत होते. परंतु अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय खात्यात नोकरी मिळाल्यानंतर अल्पावधीतच त्याच्या मालमत्तेत वाढ

अमरावती : फक्त प्रथम नियुक्तीच्यावेळी मत्ता व दायित्वे याची विवरण पत्र सादर करण्यात येत होते. परंतु अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय खात्यात नोकरी मिळाल्यानंतर अल्पावधीतच त्याच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे शासनाच्याही निदर्शनास आले आहे. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील आकडेवारीनुसार यामध्ये दरवर्षी दुपटीने वाढ होत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर यापुढे शासनाच्या विविध यंत्रणेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ३१ मेपूर्वी दरवर्षी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मालमत्तेचे विवरण द्यावे लागणार आहे. हे विवरण सीलबंद पाकिटात संबंधित विभाग प्रमुखाकडे गोपनियरित्या ठेवण्यात येणार असून एखाद्या कर्मचाऱ्याची मालमत्तेसंदर्भात गंभीर स्वरुपाची तक्रार आल्यास ही गोपनिय माहिती उपयोगात आणल्या जाणार आहे. पदोन्नतीनाही मिळणार ब्रेकवार्षिक मालमत्ता विवरण पत्रे सादर करणे ही राज्य शासनामधील सर्व टप्प्यांवरील पदोन्नती, आश्वासित योजनेंतर्गतच्या पदोन्नती, प्रतिनियुक्ती, विदेश दौरा यासाठी पूर्वअट म्हणून विहित करण्यात येत आहे. परिणामी कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यास आश्वासित व नियमित पदोन्नतीचा लाभ देण्यापूर्वी किंवा प्रतिनियुक्तीस अनुमती देण्यापूर्वी तसेच कार्यालयीन विदेश दौऱ्यास अनुमती देण्यापूर्वी त्याने ३१ मार्च रोजीच मालमत्तेचे विवरण पत्र सादर केले नसल्यास अशांना पदोन्नती व आश्वासित योजनेतील पदोन्नती देण्यात येणार नाही. या शासन निर्णयात मात्र गट ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. हे कर्मचारी वगळता इतर सर्व कर्मचाऱ्यांना मालमत्तेचे विवरण सादर करणे बंधनकारक आहे. शासनाने २ जून रोजी यासंदर्भात सर्वच शासकीय कार्यालयांना परिपत्रक जारी केले असून यावर्षी ३० जूनपर्यंत ही माहिती सादर करणे कर्मचाऱ्यांना आवश्यक आहे.