शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'सीएफ'ला डावलून 'डीएफओं'ना थेट निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:48 IST

सामाजिक वनीकरणाचा प्रताप : शासनाने मागितला दोन वर्षांचा लेखाजोखा

- गणेश वासनिक

अमरावती : सामाजिक वनीकरणच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी वनसंरक्षक (सीएफ) यांना डावलून मर्जीतील विभागीय वनाधिकारी (डीएफओ) यांना विविध साहित्य, विकासकामांसाठी थेट निधी वाटप केला. हा अफलातून प्रकार शासनाच्या निदर्शनास आला आहे. बीडीएसद्वारे निधी वितरीत न करता थेट निधी वाटप केल्याप्रकरणी राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी गत दोन वर्षांचा लेखाशीर्षानुसार अहवाल मागितला आहे. त्याअनुषंगाने ६ सप्टेंबर २०१८ रोजी शासनाने पत्रदेखील जारी केले आहे.

राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) वीरेंद्र तिवारी यांनी सामाजिक वनीकरणाचे मुख्य वनसंरक्षकांच्या नावे पत्र पाठवून निधी वितरणबाबतची कार्यपद्धती सुस्पष्ट केली आहे. सामाजिक वनीकरणामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी शासनस्तरावरून बीडीएसद्वारे निधीचे वितरण केले जाते. निधी वितरण आणि खर्चाबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. असे असताना सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून बीडीएसद्वारे निधी वितरण न करता ‘सीएफ’ला डावलून ‘डीएफओं’ना थेट निधी देत असल्याची बाब निदर्शसनास आली आहे. हा प्रकार शासन निर्णयाला छेद देणारा असल्याचे पत्रात नमूद आहे. त्यामुळे विभागीय वनाधिकाऱ्यांनी सन २०१७-२०१८ व २०१८-२०१९ मध्ये कोणत्या लेखाशीर्षाखाली कोणकोणत्या बाबींवर निधी खर्च केला, यासंदर्भात तपशील मागविला आहे. त्यामुळे ‘सीएफ’यांना डावलून ‘डीएफओं’नी नेमके कोणते साहित्य खरेदी केले, हे अहवालाअंती स्पष्ट होणार आहे. सामाजिक वनीकरणाच्या वरिष्ठांनी ‘सीएफ’यांना बायपास कशासाठी केले, हादेखील संशोधनाचा विषय आहे.

 

सहा विभागांत १२ कोटींच्या निधींचे होणार आॅडिटसामाजिक वनीकरणाच्या ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा विभागात प्रत्येक विभागनिहाय वाटप करण्यात आलेल्या दोन कोटींच्या निधीनुसार एकूण १२ कोटींच्या निधीचे आॅडिट केले जाणार आहे. त्यानुसार शासनाने पत्र जारी केले आहे. मर्जीतील विभागीय वनअधिकाºयांना वाटप झालेल्या निधीमध्ये बरेच काही दडले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हे साहित्य खरेदीसाठी दिला निधीसामाजिक वनीकरण विभागात ट्री-गार्ड, सोलर पंप, कोको पीट, ग्रीन हाऊस, पॉलिगॉन, पॉलीट्यूब व स्टॅन्ड, सोलर दिवे आदी साहित्य खरेदी करण्यात आले आहे. वृक्षसंवर्धन आणि संरक्षणाच्या नावे ठराविक पुरवठादाराकडून हे साहित्य खरेदी करण्यात आल्याचा ठपका शासनाने ठेवला आहे. त्यामुळे निधीवाटपात गौडबंगाल असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग