शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात ‘डिजिटल लॉकर्स’ प्रणाली, जगात कोठेही मिळणार दस्तऐवज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:34 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता परदेशातही त्यांचे शैक्षणिक दस्तऐवज क्षणात उपलब्ध होऊ शकतील, अशी व्यवस्था डिजिटल लॉकर्स प्रणालीद्वारे करण्यात आली आहे

अमरावती, दि. 8 -  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता परदेशातही त्यांचे शैक्षणिक दस्तऐवज क्षणात उपलब्ध होऊ शकतील, अशी व्यवस्था डिजिटल लॉकर्स प्रणालीद्वारे करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड (सीडीएसएल व्हेन्चर्स) सोबत करार झाला असून, विद्यापीठाने पेपरलेस कारभाराच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.राज्यातील सर्वच विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना डिजिटल लॉकर्स उपलब्ध करून द्यावेत, अशा केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशानुसार परीक्षा विभागाने हे पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षित रहावीत आणि ती त्यांना कुठल्याही ठिकाणी केव्हाही उपलब्ध व्हावीत, यासाठी ‘सीडीएसएल व्हेन्चर्स लिमिटेड’सोबत २१ जुलै २०१७ मध्ये करार करण्यात आला आहे. यंदा प्रथमच चालू शैक्षणिक वर्षाचे दस्तऐवज डिजिटल लॉकर्स प्रणालीतून विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. सन २०१९ पर्यंत ही एजन्सी कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना डिजिटल लॉकर्स प्रणालीतून शैक्षणिक दस्तऐवज देणार असल्याचा करार झाला आहे. यासाठी चालू वर्षाचा डेटा डिजिटल लॉकर्स प्रणालीत जमा करण्यात आला आहे. डिजिटल स्वाक्षरीने शैक्षणिक दस्तऐवज दिले जाणार असून त्याकरिता विद्यापीठाने उपकुलसचिव दर्जाचे नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. जगात कोणत्याही ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे एका ‘क्लिक’वर मिळतील. यापुढे टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दस्तऐवज डिजिटल लॉकर्समध्ये जमा केले जातील. तत्पूर्वी पुढील आठडवड्यात संबंधित यंत्रणेमार्फत या व्यवस्थेचे प्रात्यक्षिक होणार असल्याची माहिती आहे. गेट-वे प्रणालीने पेमेंट करताच मिळतील दस्तऐवजअमरावती विद्यापीठाशी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे आता डिजिटल डिपॉझिटवर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी गेट-वे प्रणालीद्वारे आॅनलाइन शुल्क अदा केल्यास लॉकर्समध्ये असलेले शैक्षणिक दस्तऐवज क्षणात मिळतील. त्याकरिता विद्यार्थ्यांना कोड क्रमांक दिला जाईल. ‘‘विद्यापीठाचा कारभार आधुनिक आणि डिजिटाईज्ड व्हावा, यासाठी अनेक योजना, उपक्रम सुरु केले आहेत. पेपरलेस कारभारासाठी डिजिटल लॉकर्स प्रणाली येत्या आठवड्यापासून सुरु होईल.-जयंत वडते,संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ विद्यापीठ