धारणीतील प्रकार : ईव्हीनिंग वॉक’चे प्रमाण कमीधारणी : दररोज ‘इव्हीनिंग वॉक’साठी जाणाऱ्या धूम स्टाईल मोटरसायकल चालकांनी जखमी केल्याने फिरणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सायंकाळदरम्यान फिरणाऱ्याांचे प्रमाण कमी झाले असून वैद्यकीय सल्ल्याने पायी फिरणे आवश्यक असणाऱ्यांचे आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहे. वैद्यकीय सल्ल्याने किंवा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तर काहींना आजार नसताना भविष्यातील आजार टाळता यावे म्हणून सकाळी व सायंकाळी महिला, पुरुषवर्ग दररोज फिरायला जात असतात. यासाठी शहरात उपलब्ध एकमेव अमरावती-बऱ्हाणपूर मुख्यमार्ग क्रमांक ६ चा वापर केला जातो. बस स्थानकपासून वन तपासणी नाका, गजानन महाराज मंदिर, दिया फाटा, कुसुमकोट मार्ग या रस्त्यावर लोक मॉर्निंग व इव्हीनिंग वॉक करतात. परंतु आता त्यांच्या या आरोग्यासाठी फिरणेच जीवावर बेतू लागले आहे.
धूम स्टाईल चालकांनी केले अनेकांना जखमी
By admin | Updated: July 8, 2015 00:23 IST