एकता कपूरविरूद्ध धनगर समाज एकवटला; दर्यापूर पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 11:03 AM2020-09-12T11:03:06+5:302020-09-12T11:03:25+5:30

व्हर्जिन भास्कर या वेबसिरीजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव वापरल्याने महापुरुषांचा अवमान आणि समाजात रोष निर्माण झाला आहे. परिणामी एकता कपूर व अन्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार धनगर समाजाबांधवांनी स्थानिक पोलिसांना दिले आहे.

Dhangar Samaj rallied against Ekta Kapoor; Complaint to Daryapur police | एकता कपूरविरूद्ध धनगर समाज एकवटला; दर्यापूर पोलिसांत तक्रार

एकता कपूरविरूद्ध धनगर समाज एकवटला; दर्यापूर पोलिसांत तक्रार

Next
ठळक मुद्देपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव वापरल्याने भावना दुखावल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सिनेनिर्माता एकता कपूर यांनी निर्माण केलेल्या व्हर्जिन भास्कर या वेबसिरीजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव वापरल्याने महापुरुषांचा अवमान आणि समाजात रोष निर्माण झाला आहे. परिणामी एकता कपूर व अन्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार धनगर समाजाबांधवांनी स्थानिक पोलिसांना दिले आहे.
व्हर्जिन भास्कर (सिझन २) ही वेब सिरीज एका खासगी वाहिनीवर रिलीज झाली आहे. ही वेबसिरीज फक्त प्रौढांसाठी आहे. या सिरीजमध्ये गैरप्रकार चालणाऱ्या होस्टेलचे नांव अहिल्याबाई लेडीज होस्टेल असे दाखविण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या देशातील नीतीमान राज्यकर्त्यांचा यादीत सर्वोच्च स्थानावर असून त्यांना तत्त्वज्ञ महाराणी म्हणून ओळखले जाते. असे असूनही एकता व शोभा कपूर यांनी निर्माण केलेल्या वेबसिरीजमध्ये अहिल्यादेवी यांचे नाव कुटिल उद्देशाने वापरुन त्यांचा व समस्त देशवासियांचा अवमान केला आहे. निर्मात्या शोभा कपूर व एकता कपूर आणि दिग्दर्शक साक्षात दळवी व संगीता राव यांच्याविरुद्ध महापुरुषांचा अवमान, समाजात रोष निर्माण करणे, शांतता बिघडवणे या गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, वेब सिरीजचे प्रक्षेपण थांबवण्यात यावे, अशी मागणी डॉ.संदीप सुशीर, माणिकराव नागे, योगेश पातुर्डे, दिगंबर नवलकार, हरिभाऊ नागे, खंडेराव पातुर्डे, गोपाल नागे, सतीश अघडते, दीपक लताड आदींनी केली आहे.

Web Title: Dhangar Samaj rallied against Ekta Kapoor; Complaint to Daryapur police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.