शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
6
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
7
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
8
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
9
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
10
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
11
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
12
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
13
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
14
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
15
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
16
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
17
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
18
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
19
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
20
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारीला वरुडात भाजपातून तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 11:21 IST

Amravati : स्थानिक आमदार निकष अमान्य; आ. चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. अनिल बोंडे, आशिष देशमुख यांच्यासमक्ष भाजप पदाधिकारी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्क वरूड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. अनिल बोंडे, माजी आ. आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी वरूड येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, जुन्या- जाणत्या नेत्यांनी महायुतीतून आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी देऊ नका, असा सज्जड इशारा देत उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला. तब्बल तीन, साडेतीन तास चाललेल्या या मेळाव्यात आमदार भुयार नकोच, अशीच रोखठोक भूमिका भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घेतली. 

नुकत्याच झालेल्या वर्धा लोकसभा निवडणुकीत मोर्शी-वरूडमध्ये भाजप उमेदवार आघाडीवर होते. रामदास तडस यांना ९० हजार मते मिळाली होती. ही मते भाजपचे असून यात स्थानिक आमदार देवेंद्र भुयार यांचा काडीचाही वाटा नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतून वरूड-मोर्शी मतदार संघ हा भाजपच्या वाट्याला यावा, अशी एकमुखी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढ्यात ठेवली. 

विधानसभेची उमेदवारी देताना स्थानिक आमदार हे निकष मोर्शी वरूड मतदार संघासाठी लागू करू नका, अशा भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. लोकसभा निवडणुकीत स्थानिक आमदार देवेंद्र भुयार कोठेही दिसून आले नाही. महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी ते फिरकले नाहीत. मोर्शी-वरुड मतदार संघातून ९० हजार मते हे केवळ भाजपचे असून यात आ. भुयार यांचा कोणताही वाटा नाही, असे पदाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितले. 

महायुतीच्या घटक पक्षाला विचारले तरीही मोर्शीतून भाजपचा उमेदवार द्या, अशीच मागणी पुढे येईल, अशा संतप्त भावना या मेळाव्यातून भाजप कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष मांडल्या. काहीही झाले तरी मोर्शी मतदार संघ महायुतीतून भाजपच्या पदरात पाडू, अन्यथा विधानसभेत याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत भाजप पदाधिकाऱ्यांनी आ. देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला, हे विशेष.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाAmravatiअमरावती