शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात साडेअकरा कोटींची विकासकामे, विकासात राज्यात राहणार अग्रेसर- प्रताप अडसड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 20:48 IST

अमरावती- निवडणूक काळात वचननाम्यात दिलेल्या शब्दांचे पालन करीत एका वर्षात तब्बल साडेअकरा कोटींची विकास कामे शहरात करण्यात आली असून आगामी चार वर्षांत हे शहर राज्यात विकासाच्या दृष्टिकोनातून अव्वलस्थानी राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी पत्रपरिषदेत दिली़धामणगाव नगरपरिषदेच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगराध्यक्ष अडसड म्हणाले, ...

अमरावती- निवडणूक काळात वचननाम्यात दिलेल्या शब्दांचे पालन करीत एका वर्षात तब्बल साडेअकरा कोटींची विकास कामे शहरात करण्यात आली असून आगामी चार वर्षांत हे शहर राज्यात विकासाच्या दृष्टिकोनातून अव्वलस्थानी राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी पत्रपरिषदेत दिली़

धामणगाव नगरपरिषदेच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगराध्यक्ष अडसड म्हणाले, शहरात वैशिष्टपूर्ण निधीअंतर्गत राठीनगर, लुनावतनगर, भागचंदनगर, जिमखाना परिसर, कोठारी नगर, श्रीविहार कॉलनी, बोहरा कब्रस्थान, धवनेवाडी, श्रीकृष्णदास राठी नगर, तुळजाईनगर, भिकुजीनगर, सर्वोदयनगर यासह २० खुल्या जागांना कुंपण भिंत व सौंदर्यीकरण करण्यात आले असून पाच कोटींची विकासकामे गत एक वर्षात शहरात झाली आहेत. 

तीन कोटींचे शहरात रस्तेरस्ता निधी विकास अंतर्गत मागील अनेक वर्षांपासून रखडलेला शास्त्री चौक, धवणेवाडी या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. लुनावतनगर, शिवाजी वॉर्ड, स्वामी समर्थ मंदिर परिसर, सर्वोदय कॉलनी, साईमंदिर परिसर, राठीनगर हनुमान मंदिर परिसर या भागात नगरोत्थान विकास निधी अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले आहेत. 

स्वच्छ शहराला पुढाकारच्स्वच्छ भारत अभियानांतर्गत या शहराने एक पाऊल पुढे टाकत शहरात तब्बल ७१० शौचालये बांधण्यात आले. भारत सरकारच्या स्वच्छ नगरपरिषद या स्पर्धेत धामणगाव नगर परिषदेने सहभाग घेतला होता़ आपल्या धामणगाव नगरीला अधिक  स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी तसेच राष्ट्रीय स्तरावर या शहराची मान उंचाविण्याकरिता सर्व जनतेने आपला परिसर, घर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी केले आहे.