शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

पर्यटन क्षेत्राच्या विकासाला हवी चालना

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पर्यटन क्षेत्राला अधिक महत्त्व मिळत असताना सोन्याची भूमी असलेल्या या तालुक्याची प्रगती पर्यटन क्षेत्रात झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे़

राजकीय इच्छाशक्तीची गरज : तळेगाव, आष्टा, पिंपळखुटा या गावांचा व्हावा कायापालट धामणगाव रेल्वे : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पर्यटन क्षेत्राला अधिक महत्त्व मिळत असताना सोन्याची भूमी असलेल्या या तालुक्याची प्रगती पर्यटन क्षेत्रात झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे़ आजही या तालुक्यातील पर्यटन व तीर्थस्थळे उपेक्षित आहे़ या तीर्थस्थळांना दर्जा व शासनाचा निधी उपलब्ध झाल्यास पर्यटकांचा गर्दी या तालुक्याकडे राहील व महसुलातही वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़गुंजी टेकडी व पिंपळखुट्याला हवाय न्यायअर्जुनसिंग राणाच्या अंजनसिंगीत कान्होजी महाराजांचे जागृत मंदिर आहे.या मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे़ कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे सहकारी असलेले चिंधे महाराज यांचे समाधीस्थळ तालुक्यात गुंजी टेकडीवर आहे़ चिंधे महाराज यांनी आपल्या वैभवी जीवनाला रामराम ठोकून १९३४ साली ईश्वरांच्या शोधात वयाच्या १६ व्या वर्षी गृहत्याग केला़ त्यांनी या तालुक्यात त्याक ाळी श्रमदानातून रस्ते तयार केले़ भजन कीर्तन व प्रवचन यातून समाज जागृती केली़ अनेक भजने हिंदी व मराठी भाषेतून लिहिली आज संपूर्ण महाराष्ट्रात या कर्मयोगीची ख्याती असताना जिथे या महात्म्याची समाधी आहे त्या गुंजी टेकडीला पर्यटनस्थळ करणे आता शासनाच्या हाती आहे़ राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले जिल्ह्यातील विश्वधाम पिंपळखुटा येथे साकारले आहे़ तब्बल दीडशे मूर्ती या भक्तीधामात बालपणापासून नदीच्या तिरावर बसत असलेले संत शंकर महाराज हे गुरूची आराधना करीत असे़ केवळ अल्पशिक्षण असलेल्या या सदगुरूने गुरूमाऊलीच्या प्रेरणेने महिमामृत ग्रंथ लिहिला आहे़ आज त्यांचे अनेक ग्रंथ आहेत़ आठ हजार स्क्वेअरफूट जागेते साकारलेले विश्वमंदिर भक्तीधामात दररोज पाचशे भाविकांना अन्नदान करण्यात येते़ तीर्थस्थळाचा अधिक विकास होणे गरजेचे असताना येथील अनेक प्रस्ताव प्रशासनाच्या लालफितशाहीत अडकले आहे़ भक्त निवासा करीता पाचशे खोल्यांसाठी शासनाकडून अर्थसहाय्याची गरज आहे़ दररोज हजारो भाविक येथे येत असताना साधी अमरावतीवरून या तीर्थस्थळी जाण्यासाठी एसटी नाही़ ही बस सुरू करण्यासाठी प्रशासन पुढे येत नाही़तळेगाव दशासरला हवाय पर्यटन स्थळाचा दर्जाधामणगाव शहर हे स्वातंत्र्योत्तर काळातील शहर आहे़ परंतु या शहराचा पूर्वी चांदूररेल्वे तालुक्यात समावेश होता़ विस्ताराने मोठा असल्याने प्रशासकीय सोय म्हणून या तालुक्याचे विभाजन करण्यात आले़ सन १९९२ मध्ये धामणगाव तालुका अस्तित्वात आला़ तालुक्याचे केंद्रबिंदू असणाऱ्या या शहराचा भारताचाही केंद्रबिंंदू म्हणून उल्लेख आहे. या तालुक्याचे क्षेत्रफळ ६३,३२१़०६ हेक्टर असून गावाची संख्या ११२ तर ग्रामपंचायतींची संख्या ६२ व एक नगरपरिषद आहे़ धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे पुन्हा सुरू झालेला शंकरपट हे या तालुक्याचे भूषण ठरले आहे़ या पुरातन गावात पैराणिक काळातील दगडी चिऱ्यांची विहीर आहे़ दुसरी विहीर जुना बसस्थानक परिसरात आहे़ आजही या विहिरीत पाणी आहे़ हनुमानाचे मंदिर, महादेवाची पिंड व पौराणिक मूर्ती या मंदिरात अनेक वर्षांपासून आहेत. याकडे आज महसूल प्रशासनासोबतच सर्वांचे दुर्लक्ष आहे़ विशेषत: याच गावात गुप्तकालीन विटाने बांधलेल्या वास्तूचे पायवे व तळमजले आढळतात़ ब्रम्हपूर्वकालीन राजमनीकडून गौरविलेल्या विद्यावैभावाची कीर्ती ऐकून येथे जैन, बुध्द, महानुभव पंडित असे थोर विचारवंत येऊन गेलेत़ गावाचे पात्रीकरण सिध्द करणारे अनेक पुरावे येथे आहे़ पाण्यावर तरंगणाऱ्या विटांकडे आजही संशोधकांचे दुर्लक्ष आहे़ या विटा काळ्या रंगाच्या स्पंजसारखी छिद्रे असलेल्या सोळा, दहा व तीन अशा आकाराच्या असून त्या वजनाने हलक्या तसेच अतिशय टनक आहेत़ बैलबंडी गेली किंवा कुऱ्हाडीने तोडल्यास या विटा तुटत नाहीत़ विटा गुप्तकालीन असून त्या पाण्यावर कशा तंरगतात याचा शोध स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही घेण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही़ या गावाकडे आजही पर्यटक विभागाने लक्ष दिले आणि या वास्तूचे जतन केले तर हे गाव पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंंदू ठरू शकते़मुंडाचे गाव मंगरूळ दस्तगीर अद्यापही उपेक्षिततालुक्यातील दुसरे गाव म्हणून मंगरूळ दस्तगीर या गावाचे पौराणिक महत्त्व आहे़ ज्यावेळी गावात उत्खनन होते़ त्यावेळी अनेक पुरातन मूर्ती या गावात मिळते़ मुंडाचे गाव म्हणून आजही ओळखले जाते़ इतिहासाची पाने चाळली असता कोरीव काम असलेले दत्तमंदिर, प्राचीन श्रीमंगला माता मंदिर चार खांबांवर उभे असलेले श्रीराम मंदिर व दत्तगीर महाराजांचे बुरूज पहायला मिळते़ या गावात पांडुरंग महाराज, केकाजी महाराज, दत्तगीर महाराज, बगाजी महाराज यांचे वास्तव्य राहिले आहे़ इवेत निशानधारी संस्थेचे संस्थापक व सामाजिक क्रांतीचा झेंडा फडकविणारे श्रीसंत गणपती महाराज हे स्वातंत्र्यपूर्व काळात जाती-पातीचे क डे तोडून अांतरजातीय विवाह घडून आणणारे संत होऊन गेलेत़ वर्धा नदीकाठी असलेले बगाजी महाराज यांच्या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा मिळाल्यास भाविकांच्या गर्दीत अधिक भर पडू शकते़ सर्वेक्षर मंदिराकडे होतेय दुर्लक्ष आकर्षकांना वेध लावणाऱ्या तरोडा येथे टेकडी आहे़ जागृत सर्वेक्षर हनुमान मंदिर या टेकडीवर आहे़ हनुमान जंयतीच्या वेळीच नव्हे, तर दररोज भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात़ प्रशासनाकडून या मंदिराच्या व टेकडीच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती आहे़ सर्वधर्म समभावाची वागणूक देणारे मौलाजी महाराज यांचे मंदिर उसळगव्हाण येथे आहे़ दररोज या मंदिरात भाविकांची मांदियाळी असते़ विरूळ रोंघे, सोनोरा काकडे, दिघी महल्ले, आदर्श ग्राम झाडा, वरूड बगाजी या गावांसह तालुक्यातील अनेक गावांची इतिहासाची नोंद घेऊन पर्यटक व भाविकांना आकर्षित करणारा धामणगाव तालुक्याला आगामी काळात उपेक्षित न राहता तीर्थस्थळ व पर्यटकांचा दर्जा मिळणे गरजेचे आहे़