शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर राज्यातील शाळांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

अमरावती : महाराष्ट्राताल ४८८ जिल्हा परिषद शाळांचा ५०० कोटी रुपये खर्चुन आदर्श शाळा म्हणून विकास करण्याची शालेय शिक्षण ...

अमरावती : महाराष्ट्राताल ४८८ जिल्हा परिषद शाळांचा ५०० कोटी रुपये खर्चुन आदर्श शाळा म्हणून विकास करण्याची शालेय शिक्षण विभागाची योजना प्रगतिपथावर असताना आता दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर राज्यातील सरकारी शाळांच्या विकासाचा आणखी एक प्रयोग राबविण्याचा विचार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वेळेस शाळांच्या विकासाकरिता ग्रामविकास विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागातर्फे एक अभ्यासगट त्याकरिता दिल्लीला धाडण्यात येणार आहे.

दिल्लीतील सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांच्या धर्तीवर मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरीचिंचवड आदी महानगरपालिका शाळांचा विकास करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर हा विषय मागे पडला.

दरम्यान शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ सरकारी शाळा आदर्श म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाअंतर्गत ४८८ शाळांच्या विकासासाठी ४९४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यात शाळांमधील भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता विकासावरही भर दिला जाणार आहे.

//////

बॉक्स १

अभ्यासगट जाणार दिल्लीला

शालेय शिक्षण विभागाची ही योजना आकाराला येत असताना ग्रामविकास विभागानेही दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी पुढाकार घ्यायचे ठरविले आहे. दिल्लीतील अशा सरकारी शाळांचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षक आदींचा समावेश असलेला एक अभ्यासगट दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. या अभ्यासगटाने आपला अहवाल ग्रामविकास मंत्र्यांना सादर करायचा आहे

///////

अभ्यास कसला?

दिल्लीतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी-शिक्षकांकरिता असलेल्या सुविधा, विद्यार्थ्यांचे आचार-विचार सुधारण्यासाठी व अंगी शिस्त बाणवण्यासाठी राबविण्यात येणारी कार्यपद्धती यांचा अभ्यास हा गट करेल. दिल्लीतील केजरीवाल सरकारने खासगी शाळांप्रमाणे सरकारी शाळांचे रूप पालटवले. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये डिजिटल वर्ग, सुसज्ज खेळाच्या सुविधा, जलतरण तलाव पाहायला मिळतात. या शाळांमध्ये गुणवत्ता विकास होऊन निकालही वधारला आहे.