शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

निधीअभावी रखडला शेंडगावचा विकास आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

शेंडगाव ही गाडगेबाबांची जन्मभूमी आहे, तर ऋणमोचण ही कर्मभूमी आहे. वलगाव ही निर्वाणभूमी आहे, तर समाधीस्थळ गाडगेनगर येथे आहे. गाडगेबाबांचा जन्म झाल्यानंतर गाडगेबाबा लहानपणी काही वर्षे शेंडगावात आईसोबत येथे वास्तव्याला होते. पण, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा येथे आईसमवेत मामाकडे आसरा घेतला.

ठळक मुद्देतत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट : प्रशासकीय मंजुरी मिळाली; निधीची तरतूद होणार केव्हा?

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्मयोगी संत गाडगेबाबांचे जन्मस्थळ असलेल्या अंजनगाव तालुक्यातील शेंडगाव येथील १८.५९ कोटींचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखडा निधीअभावी रखडला आहे.तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पाठविलेला गाडगेबाबांच्या अर्धाकृती पुतळा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बसविण्यात आला होता. सदर विकास आराखड्याला शासनाने मे २०१९ ला प्रशासकीय मंजुरीही दिलीे. मात्र, यावर निधीची कुठलीही तरतूद करण्यात न आल्याने सदर विकास आराखडा रखडला आहे.शेंडगाव ही गाडगेबाबांची जन्मभूमी आहे, तर ऋणमोचण ही कर्मभूमी आहे. वलगाव ही निर्वाणभूमी आहे, तर समाधीस्थळ गाडगेनगर येथे आहे. गाडगेबाबांचा जन्म झाल्यानंतर गाडगेबाबा लहानपणी काही वर्षे शेंडगावात आईसोबत येथे वास्तव्याला होते. पण, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा येथे आईसमवेत मामाकडे आसरा घेतला.ज्या गाडगेबाबांनी संपूर्ण महाराष्ट्रात समाजप्रबोधनातून, कीर्तनातून लोकांमध्ये जनजागृती केली, लोकांच्या मनातील घाण साफ केली, स्वच्छतेचा संदेश दिला, गरिबांसाठी राज्यभर अनेक ठिकाणी अनाथाश्रम, आश्रम शाळा काढल्या, त्याच गाडगेबाबांच्या जन्मस्थळाचा विकास शासन गेल्या अनेक वर्षांपासून करू शकले नाही. इतर राज्यातील पर्यटकांनासुद्धा नेहमीच शेंडगावचे आर्कषण राहते. परंतु, या ठिकाणी कुठल्याही सुविधा नाहीत. त्यामुळे शेंडगावात ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी येथे भेट देऊन निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर माजी आमदार रमेश बुंदिले यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय मंजुरी मिळाली; मात्र निधीची तरतूद झाली नाही. यंदाच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेंडगावाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी शेंडगाव येथील नागरिकांची अपेक्षा आहे. त्याकरिता दर्यापूरचे नवनिर्वाचित आमदार बळवंत वानखडे यांनी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. शासनाने १८ एकर जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली असून, विकास आराखड्यामध्ये सभागृह, भक्तनिवास, गाडगेबाबांचे स्मृतिकेंद्र, बगीचा व इतर कामांचा समावेश आहे. भुलेश्वरी नदीच्या तिरी वसलेल्या शेंडगावात विकास आराखडा पूर्ण झाल्यास देशभरातून पर्यटक येतील, अशी अपेक्षा आहे.