शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या आशेवर पाणी, मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावाचा विकास शून्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 17:19 IST

गावाचा विकास होणार व कित्येक वर्षांपासून वंचित असलेल्या आपल्या गावातही लवकरच सुविधा उपलिब्ध होतील, अशी आशा नागरिकांना होती. मात्र,

सूरज दहाट तिवसा (अमरावती) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिवसा तालुक्यातील शिरजगाव (मोझरी) हे गाव दत्तक घेतले. यामुळे गावाचा विकास होणार व कित्येक वर्षांपासून वंचित असलेल्या आपल्या गावातही लवकरच सुविधा उपलिब्ध होतील, अशी आशा शिरजगावच्या नागरिकांना होती. मात्र, मागील आठ महिन्यांत विकासाच्या केवळ प्रतीक्षाच असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिरजगाव (मोझरी) हे तालुका मुख्यालयापासून १० किमी, तर राष्ट्रीय महामार्गापासून ४ कि मी अंतरावर आहे. चार हजार लोकसंख्या असलेल्या या गावात कधी काळी निर्माण करण्यात आलेल्या सुविधा आजही कायम आहे. गावात जिल्हा परिषदेची व एक खासगी शाळा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेची दूरवस्था झाली आहे. गावात शेती सिंचनासाठी दोन तलाव आहेत. मात्र दोन्ही तलावांत पाण्याचे नियोजन होत नाही. परिणामी शेतकºयांना ओलिताविना शेती करावी लागते. गावातील शंभराहून अधिक शेतकºयांवर कर्जाची टांगती तलवार आहे. गावापर्यंत पोहचण्यासाठी खड्यातून वाट काढावी लागते. गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून आठवड्यात एकदा भरणाºया आठवडी बाजाराची घाण पुढील बाजाराच्या दिवशीपर्यंत तशीच पडलेली असते. नाल्यांची स्वच्छता होत असल्याने दुर्गंध परसलेला आहे. गावातील सार्वजनिक वापराच्या स्वच्छता गृहांची अवस्था दयनीय झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी गावा दत्तक घेतल्यावर त्यात सुधारणा होतील, अशी अपेक्षा फोल ठरली आहे.प्रतिनिधी सरकारचे गोडवे गाणारा आठ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी स्वप्निल देसळे गावात आले. आता आपल्या गावाला सोन्याचे दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकासावर स्थानिकांशी चर्चा करण्यास नागरिकांनी पुढाकार घेतल्यावर प्रतिनिधी फक्त सरकारचे गुणगान करीत असल्याचे मत गावकºयांनी नोंदविले.अवैध दारूविक्रीला उधाणशिरजगावात दारूबंदी होती. आता गावात खुल्या पद्धतीने अवैध देशी दारू व गावठी दारू काढली जात असल्याचे चित्र आहे. यामुळे गावकºयांसह युवा वर्ग दारूच्या आहारी जात आहेत. दारू बंदीसाठी उभारलेला नागरिकांचा लढादेखील अयशस्वी ठरला आहे. दारू विक्रीची तक्रार करावी तरी कुणाकडे, अशी अवस्था आहे. गाव दत्तक घेऊन मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधी नेमला असेल, तरी गावाचा विकास न होणे हे सरकारचे अपयशच आहे. येथील रहिवाशांचे हाल होत आहेत. - यशोमती ठाकूर,आमदार, तिवसा   समस्या मात्र सुटत नसल्याने उंचावलेल्या आशा मावळू लागल्या आहेत. रस्ता नाही, गाव व्यसनाधीन झाले, कुणीच लक्ष देत नाही. विकास होणार कसा?- चंदू हगवणे, नागरिक शिरजगाव मागील आठ महिन्यांत गावात विकासकामे झाली नाहीत. मूलभूत सुविधा नाहीत, शेतीला जोड व्यवसाय नसल्याने युवकांचे लग्न जुळणे कठीण होत आहे. - विजय डोंगरे, युवक, शिरजगाव

टॅग्स :Devendra Fadnvisदेवेंद्र फडणवीस