शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

डेंग्यू : २६७ पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 22:36 IST

जुलैच्या २८ दिवसांत डेंग्यू संशयितांचा आकडा तब्बल २६७ वर पोहोचल्याने प्रभावी उपाययोजना राबविण्याचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. डेंग्यू नियंत्रणासाठी शहराच्या विविध भागांत प्रभावी मोहीम राबविली जाईल, असा दावा महापालिका आयुक्तांनी केला होता.

ठळक मुद्देशहरातील नाल्या तुंबलेल्याचउद्रेक : महापालिकेच्या उपाययोजना तोकड्या
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुलैच्या २८ दिवसांत डेंग्यू संशयितांचा आकडा तब्बल २६७ वर पोहोचल्याने प्रभावी उपाययोजना राबविण्याचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.डेंग्यू नियंत्रणासाठी शहराच्या विविध भागांत प्रभावी मोहीम राबविली जाईल, असा दावा महापालिका आयुक्तांनी केला होता. मात्र, त्या उपाययोजनानंतरही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ नोंदविली जात आहे. १ ते २८ जुलैपर्यंत ज्या २६७ रुग्णांचे रक्तजलनमुने घेण्यात आले, पैकी सुमारे ५० ते ६० टक्के रुग्णांच्या एनएचवन एलायझा चाचणी खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती खासगी डॉक्टरांनी दिली आहे. ही चाचणी डेंग्यू निदानासाठी उपयुक्त आहे. चार ते पाच दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालयात विषाणूजन्य तापाचे सुमारे १५० ते २०० रुग्ण दाखल असून त्यातील ७५ ते ८० रुग्ण डेंग्यूबाधित आढळून आले आहेत. त्यांच्या एनएचवन एलायझा चाचणी पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ५२ पथके कार्यान्वित करण्याचा दावा करणाºया महापालिकेचा फुगा फुटला आहे. शहरात अस्वच्छतेने कळस गाठला असून, नाल्या तुंबलेल्याच आहेत.या परिसरात आढळले डेंग्यू संशयितगणेशनगर, ज्योती कॉलनी, महालक्षमीनगर, नवीवस्ती बडनेरा, चक्रधरनगर, नवाथे, जयप्रभा कॉलनी, रविनगर, महाविरनगर, जानकीदेवी विहार, राठीनगर, सरोजकॉलनी, अंबा कॉलनी, एकनाथपुरम, गाडगेनगर, सबनिस प्लॉट, चैतन्य कॉलनी, दस्तुरनगर, धनराजनगर, पार्वतीनगर, पुंडलिकबाबा कॉलनी, दत्त कॉलनी, देशपांडे लेआउट, जेवडनगर, टेलिकॉम कॉलनी, न्यू प्रभात कॉलनी, टीटीनगर, देवरणकरनगर, पार्वतीनगर, पुंडलिकबाबानगर, अंबाविहार, न्यू गणेश कॉलनी, अयोध्दाविहार, सरस्वतीनगर, टेलिकॉम कॉलनी, उषा कॉलनी, महात्माफुले कॉलनी, छांगाणीनगर, जयंत कॉलनी, प्रेरणा कॉलनी, कुंभारवाडा, रुख्मिनीनगर, छाया कॉलनी, मधुबन कॉलनी, गोपालनगर, सदिच्छा कॉलनी, वैशाली कॉलनी, सागरनगर, उत्तम नगर, अमर कॉलनी, कॅम्प रोड, सुशिलनगर, सरोज कॉलनी, श्रीविकास कॉलनी, राधानगर, गांधीनगर, दिपानगर, महादेवनगर, मोतीनगर, कंवरनगर, शिवकॉलनीत डेंग्यू संशयित आढळलेत.यांच्या रुग्णालायात आहेत डेंग्यू रुग्णडॉ.श्रीगोपाल राठी, डॉ.पंकज बागडे, डॉ.पंकज बारब्दे, डॉ.समिर चौधरी, डॉ.अमोल अवघड, होप हॉस्पिटल, डॉ.मनोज निचत, दयासागर हॉस्पिटल, डॉ.अजय डफळे, डॉ.सचिन काळे, डॉ.राजेंद्र ढोरे, डॉ.अद्वैत महल्ले, गेटलाईफ हॉस्पिटल, डॉ.विजय बख्तार, डॉ.नीलेश पाचबुध्दे, रेडिएंट हॉस्पिटल, डॉ.प्रवीण राठी, डॉ.एन.टी.चांडक, डॉ.रोहित चोरडिया, डॉ.बोंडे हॉस्पिटल, डॉ.राजेश मिसर, लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये डेंग्यूबाधितांवर उपचार सुरू आहे.