शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचे देहवसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 8:38 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पाईक तथा ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचे गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

ठळक मुद्देराष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचार व प्रसारात गेले उभे आयुष्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पाईक तथा ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचे गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. वरूड येथे मुलाच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. मुळचे वरखेड येथील बेलूरकर यांना राष्ट्रसंतांचा सहवास लाभला होता. राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचार, प्रसारात त्यांनी उभे आयुष्य वेचले.राष्ट्रसंतांच्या हयातीत त्यांना ग्रामगीताचार्य म्हणून गौरविण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेचे आजन्म प्रचारक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या रामकृष्णदादांनी अनेक गावांत वाचनालये, व्यायामशाळा व श्रीगुरुदेव सेवा मंडळांची स्थापना केली. रामकृष्णदादा हे उत्तम मल्ल, व्यायामपटू, नाट्य कलावंत व दिग्दर्शक, शाहीर, कवी व लेखक, आदर्श प्रबोधनकार, कीर्तनकार, आयुवेर्दाचार्य तसेच ज्येष्ठ समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध होते. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे संचालक असलेले रामकृष्णदादांनी मंजूळामाता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व सीतारामदास स्वामी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी सुमारे ७५ पुस्तके लिहिलीत. अनेक पुस्तकांचे संपादन केले. सुश्राव्य वाणीतून रसिकांची मने जिंकणाऱ्या दादांनी रुग्णांवर आयुर्वेदिक उपचारसुद्धा केले. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शामजीपंत येथे दादांनी सन १९९३ मध्ये मानव विकास ज्ञान साधनाश्रमाची निर्मिती केली. दादांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, समर्थ लहानुजी महाराज, दामोदर महाराज, भूदानाचे प्रणेते विनोबा भावे, श्री. संत गाडगेबाबा, कृषी महर्षी पंजाबराव देशमुख यांच्यासह अनेक विभूतींचा सहवास लाभला. समाजप्रबोधनासह संस्कार, क्रीडा, वाचनालय, ग्रंथसंपादन अशा नानाविध पातळीवर ते तहहयात कार्यरत होते. रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या पार्थिवावर शुक्रवार, ११ जानेवारी रोजी त्यांनीच उभारलेल्या तळेगाव शामजीपंत येथील मानव विकास ज्ञान साधनाश्रमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव वरखेडमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.विविध पुरस्कारांनी सन्मानितरामकृष्णदादा बेलुरकर यांना विदर्भ साहित्य संमेलन नरखेड येथे वा.कृ. चोरघडे स्मृती साहित्य पुरस्कार, माणिकलाल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरद्वारा दे.ग. सोटे ग्रामीण साहित्य पुरस्कार, गांधी जिल्हा ज्येष्ठ समाजसेवक सन्मान, राष्ट्रसंत साहित्य संमेलन २००० मध्ये ग्राममहर्षी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सन २००४ चा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, आदिवासी विकास मंत्रालयाचा सन २००५ मध्ये आदिवासी सेवक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सन २००८ मध्ये सांस्कृतिक किर्तन/समाज प्रबोधन पुरस्कार, सन २०११ मध्ये जीवनव्रती स्वामी विवेकानंद पुरस्कार, सन २००९ तुका म्हणे खंजेरी, संशोधनात्मक साहित्य पुरस्कार, मुंबई येथे सन २०१२ मध्ये विदर्भ भूषण पुरस्कार, तसेच सन २०१३ मध्ये प्रबोधनकार के.सी. ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार यासह डझनावरी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज