शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना प्रतिविद्यार्थी १७ हजार रुपये प्रतिपूर्ती शुल्क, चौथ्या सोडतीची पालक वर्गातून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 19:01 IST

आरटीई अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रात दुर्बल आणि वंचित घटकांसाठी २५ टक्के राखीव जागांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली.

अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेश देणा-या शाळांना गतवर्षीप्रमाणे ५० टक्के प्रतिपूर्ती शुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदाही विभागातील ९५५ शाळांना प्रतिविद्यार्थी १७ हजार ६१७ रुपये मिळणार आहेत.गरिबांच्या मुलांनाही दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश घेता यावा म्हणून राज्यात ‘बालकांच्या हक्काचे व मोफत शिक्षण कायदा २००९’ अंतर्गत राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. मागील सहा वर्षांपासून अमरावती विभागात ९०० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे, तर दोन वर्षांपासून ही प्रक्रिया ऑनलाइन राबविली जात आहे. शिक्षण विभागाने २०१८-१९ चे प्रतिपूर्ती शुल्क प्रतिविद्यार्थी १७ हजार ६५७  रुपये करून ५० टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीई अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रात दुर्बल आणि वंचित घटकांसाठी २५ टक्के राखीव जागांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. इयत्ता पहिलीला प्रवेश मिळावा, यासाठी विभागातील पाच जिल्ह्यांमधील ९५५ शाळांची नोंदणी करण्यात आली होती. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल २६ हजार ९७३ अर्ज प्राप्त झाले होते. एकूण जागा १० हजार ५२२ असताना दुप्पटीहून अधिक अर्ज आल्याने स्पर्धा वाढली होती. अंतिम फेरीअखेर ८ हजार ४९४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. त्यानंतर अद्याप २०२८ जागा रिक्त आहेत. विविध कारणांनी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश या जागांवर आॅफलाइन पद्धतीने करण्याची मागणी पालकांमधून होत आहे. शासनाने यावर्षी केवळ तीन फेºयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया घेण्यात आली.

टॅग्स :Schoolशाळा