शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीची मागणी : सरपंचांची बीईओंकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:22 IST

तालुक्यातील लालखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांची परवड होत आहे. येथील सरपंचांनी शाळेत निरीक्षण केले असता, हा प्रकार उघड झाला. याची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशा मागणीची तक्रार सरपंच निरंजन राठोड (आडे) यांनी गुरुवारी खंडविकास अधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देलालखेड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील लालखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांची परवड होत आहे. येथील सरपंचांनी शाळेत निरीक्षण केले असता, हा प्रकार उघड झाला. याची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशा मागणीची तक्रार सरपंच निरंजन राठोड (आडे) यांनी गुरुवारी खंडविकास अधिकाऱ्यांकडे केली.लालखेड येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची स्थापना १९७२ मध्ये झाली. तेव्हापासून आजतागायत येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या शाळेतून अनेक विद्यार्थी घडल्याचा इतिहास आहे. मात्र, आजघडीला या शाळेची दैना झालेली आहे. आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधींनी गावाचे नेतृत्व केले. परंतु, उद्याचे भविष्य घडविणाºया चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध आहे की नाही, यावर कुणाचेच लक्ष जाऊ नये, ही खेदाची बाब आहे. नवनियुक्त सरपंच निरंजन राठोड (आडे) यांनी २४ जानेवारी रोजी पदभार स्वीकारला असून, त्यांनी नुकतीच शाळेला भेट दिली असता, तेथील टीव्ही बंद अवस्थेत दिसले. तेथे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची सुविधा नाही. प्रसाधनगृहाची सोय नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थी आपापल्या घरून पाण्याची बॉटल घेऊन येतात. शौचालय तर सोडाच धड लघुशंकादेखील उघड्यावर करावी लागत असल्याचे चित्र नवनियुक्त सरपंचांना उघड्या डोळ्यांनी बघावे लागले. याचा संताप व्यक्त करीत त्यांनी गुरुवारी चांदूर रेल्वे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन व तक्रार दिली. यावर तातडीने उपाययोजना करावी. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी उपसरपंच नंदा बल्लू राठोड, माजी सरपंच रमेश राठोड, शिक्षण समिती अध्यक्ष सोनू अनिल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रेम चव्हाण, प्रभारी सचिव एन.के. पवार उपस्थित होते.ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड दुरुस्त व्हावेतलालखेड ग्रामपंचायतीत तत्कालीन ग्रामसेवक गवई यांनी ग्रामस्थांकडून सन २०१६ ते २०१८ पर्यंतचे घर टॅक्स वसुली केल्याची रजिस्टरवर नोंद आहे. मात्र, त्यांनी ती रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमाच केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सदर रेकॉर्डची चौकशी करणे गरजेचे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Schoolशाळा