शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

सखी सन्मान पुरस्काराचे थाटात वितरण

By admin | Updated: October 27, 2016 00:09 IST

विश्वाची जननी म्हणजे स्त्री. प्रत्येक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून शेकडो जबाबदाऱ्या पेलत असते.

ज्येष्ठ साहित्यिक प्रभा गणोरकर यांना जीवन गौरव : पुष्पा सावलकर, रितू केडिया, मोहना कुळकर्णी, रजनी आमले, आशा शिरसाठ, प्रफुल्ला देशमुख, प्रतिमा इंगोलेंचा गौरवअमरावती : विश्वाची जननी म्हणजे स्त्री. प्रत्येक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून शेकडो जबाबदाऱ्या पेलत असते. अशाच ‘सामान्य ते असामान्य’ प्रवास करणाऱ्या आठ स्त्रियांना ‘लोकमत’तर्फे ‘सखी सन्मान पुरस्कारा’ने गौरवून त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला. मुख्य प्रायोजक के.के.कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूल तर सहप्रायोजक हॉटेल महेफिल इन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा पार पडला.येथील ‘हॉटेल महेफिल इन’च्या प्रशस्त लॉनवर मंगळवारी रात्री आयोजित चमकदार कार्यक्रमाला महापौर चरणजित कौर नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागचे माजी सचिव धनंजय धवड, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, के.के.एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष चंद्रभान केवलरामानी, हॉटेल महेफिल इनचे संचालक गोपाल मुंधडा, सुधा प्रभाकर वैद्य, जिल्हा कामगार अधिकारी डी.बी.जाधव, अभिनेता पवन शंकर, ‘लोकमत’चे संपादकीय प्रमुख गणेश देशमुख, उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे प्रमुख हे प्रमुख अथिती उपस्थित होते. दर्जेदार साहित्यातून स्त्रियांची व्यथा, वास्तव स्थिती आणि कर्तृत्व समाजासमोर मांडणाऱ्या प्रतिथयश लेखिका प्रभा गणोरकर यांना सुधा प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्तरादाखल, अमरावती शहराने मला घडविले. व्हिएमव्ही महाविद्यालयात माझे शिक्षण झाले. तेथेच मी पीएचडी केली. १२ वर्षे शिकविलेही. माझ्या कार्याचा ‘लोकमत’ ने माझ्या कर्मभूमीत ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान केला. हा क्षण सदैव स्मरणात राहिल, अशा शब्दांत गणोरकर यांनी भावना व्यक्त केल्या. परतवाडानजीकच्या हिरादल येथील आदिवासी सरपंच पुष्पा सावलकर यांना महापौर चरणजित कौर नंदा, जिल्हाधिकारी गित्ते यांच्या हस्ते त्यांनी केलेल्या भरीव सामाजिक कार्यासाठी गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक प्रतीमा इंगोले यांना रूपेश केवलरामानी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. रितु केडिया हिला बंगालचा उपमहासागर आणि इंग्लिश खाडी पोहून पार करण्याच्या धाडसी कामगीरीबद्दल धनंजय धवड आणि नितीन धांडे यांनी शौर्य पुरस्काराने सन्मानित केले. डॉक्टर मोहना कुलकर्णी यांना आरोग्य क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी चंद्रभान केवलरामानी यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. रजनी आमले यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी गोपाल मुंधडा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी जिल्हा कामगार अधिकारी बी.डी.जाधव यांच्या हस्ते आशा शिरसाठ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यावसायिक क्षेत्रातील दमदार कार्यासाठी माहेर गृह उद्योगच्या प्रफुल्ला देशमुख यांना अभिनेता पवन शंकर यांनी पुरस्कृत केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुरूवातीला स्थानिक शिव डान्स अ‍ॅकेडमीच्या विद्यार्थिनींनी गणेशवंदना सादर केली. ऋतिका आगरे यांनी सादर केलेल्या लावणी नृत्याने उपस्थितांना खिळवून ठेवले. शिव डान्स अकादमीच्या चमुने ‘जय हो’ या गाण्यावर नृत्य सादर करून कार्यक्रमात देशभक्तीचा हुंकार जागविला.