शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

Deepali Chavan Suicide Case : हरिसालच्या होलिकात्सवात रेड्डी, विनोद शिवकुमार बालाचे प्रतिकात्मक पोस्स्टरचे दहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 20:33 IST

Deepali Chavan Suicide Case : रविवारी हरिसाल येथे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक होळीचे दहन करताना उपस्थित काही महिला कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडत अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली.

धारणी/ चिखलदरा (अमरावती) : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात वन कर्मचाऱ्यांनी हरिसाल येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता मेळघाटचे तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी आणि निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला यांचे पोस्टर लावून होळीचे दहन केले. (Deepali Chavan Suicide Case : Symbolic poster burning of M S Reddy, Vinod Shivkumar Bala at Harisal Holikatsava)

यावेळी दीपाली चव्हाण अमर रहे, एम. एस. रेड्डी मुर्दाबाद, विनोद शिवकुमार बाला मुर्दाबाद असे नारे लावत दोघांच्या फोटोंना महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी चपलेचा प्रसाद दिला. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. सर्वत्र या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला फाशी देण्यासह त्याला बळ देणाऱ्या एम एस. रेड्डींनाही निलंबित व बडतर्फ करण्याची मागणी वनपाल वनकर्मचारी संघटनेच्यावतीने लावून धरण्यात आली आहे. रविवारी खासदार नवनीत राणा व बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याकडे वनपाल व वन कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडल्या. मोठ्या प्रमाणात वन विभागातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अनेक दीपाली आहेत वनविभागातरविवारी हरिसाल येथे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक होळीचे दहन करताना उपस्थित काही महिला कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडत अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली. गावकरी व अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. विनोद शिवकुमार बालाचे अनेक कारनामे यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी पुढे आणले.

क्रूर प्रवृत्तीचे दहनआरोपी विनोद शिवकुमार बाला व अन्य अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून अजूनही कुणी महिला कर्मचारी व इतर कर्मचारी बळी पडू नये, त्या राबवून घेण्याच्या कुप्रवृत्तीचे दहन करण्याचा निर्णय वनपाल वनरक्षक संघटनेने घेतला. या क्रूर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांचे पोस्टर होळीला गुंडाळून जाळण्यात आले. वनपाल, वनकर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेचे विविध पदाधिकारी कर्मचारी, गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणAmravatiअमरावतीforest departmentवनविभाग